'...तर तुम्हाला मारून टाकेन'; रांजणगावात जावयाकडून सासर्याला चाकू दाखवून धमकी
शिक्रापूर : रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथील पाचुंदकर वस्ती येथे घरगुती वादातून संदीप चौधरी या इसमाने स्वतःच्या सासर्याला शिवीगाळ, दमदाटी करत चाकू दाखवून मारून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे संदीप बबन चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथील पाचुंदकर वस्ती येथे राहणारे प्रभाकर पाटील यांचा जावई संदीप चौधरी हा त्यांच्या मुलीला वारंवार मारहाण करत त्रास देत असल्याने प्रभाकर यांनी मुलगी व नातवाला माहेरी आणले होते. त्यानंतर प्रभाकर यांचा जावई बबन चौधरी हा त्यांच्या घरी येऊन माझी बायको कुठे आहे? असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करत ‘खिशातील चाकू काढून तुम्ही माझ्या बायकोला मुलाला आणून सोडले नाही तर तुम्हाला मारून टाकेन’ अशी धमकी दिली.
महाराष्ट्र विधान परिषदचे उपसभापति सचिन अहीरेंच्या घरी २,६५ कोटींची चोरी, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
या प्रकाराबाबत प्रभाकर पंढरीनाथ पाटील (वय ४७, रा. पाचुंदकर वस्ती, रांजणगाव गणपती ता. शिरूर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी संदीप बबन चौधरी (रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरुर जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार वैभव मोरे हे करत आहे.
प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
लातूर जिल्ह्यातून के धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय मुलीचं अपहरण करून तिला रत्नागिरी जिल्ह्यात डांबून ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. प्रेमाचे आमिष दाखवत तिच्याला पाळवून नेण्यात आलं होत. या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत संपूर्ण गुन्ह्याचा छडा लावला असून पीडित मुलीची सुटका केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Pune News : ‘चेहऱ्यावर पिंपल्स आले म्हणून…’ 27 वर्षीय विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल; पोलिस तपास सुरू






