आरोपीचं नाव राजू मसू माळी असे आहे. पोलिसांनी त्याला नेवासा येथून अटक केली आहे. पीडित महिला आणि तिचा पती बदनापूर तालुक्यातील आहेत. ते उसतोडीचे काम करतात. काही दिवसांपूर्वी आरोपीने विवाहित पीडित महिलेला इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. पीडित आणि तिचा पती गंगापूर येथे ऊसतोडीसाठी गेले असतांना आरोपीही तेथे पोहोचला. त्यांनतर दोघांमध्ये नियमित संपर्क सुरु होता.
१४ जुलै रोजी पीडित महिला तिच्या मावसभावाला भेटण्यासाठी बहिणीसोबत छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयात आली होती. चार वाजताचया सुमारास बहीण घरी गेल्यानंतर ती भावासोबत रुग्णालयात थांबली. ही माहिती आरोपीला कळताच तो तिला रुग्णालयात भेटण्यासाठी आला. रुग्णालयातून पाणी आणण्यासाठी खाली गेल्यानंतर आरोपीने तिला अडवले. माझ्यासोबत आली नाहीस तर आपले चॅट आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल. अशी धमकी त्याने दिली. भीतीपोटी महिला त्याच्या दुचाकीवर बसली. त्यांनतर आरोपीने तिचा मोबाईल हिसकावून घेतला आणि शहरापासून दूर असलेल्या एका भागातील पत्र्याच्या शेडमध्ये जबरदस्तीने नेले.
आरोपीने तिथे तिला २४ तास ओलीस ठेवले आणि तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले. १६ जुलै रोजी तो तिला नेवासा परिसरातील दुसर्या एका पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन गेला. तिथे दिवसभर तिला डांबून ठेवत रात्री पुन्हा अत्याचार केले. १७ जुलै रोजी पीडितेने मुलांची आठवण येत आहे असे सांगितले आणि मला सोडून देण्याची विनंती केली. त्यांनतर आरोपीने तिला नेवासा येथून बसमध्ये बसवून गावी पाठवले. मात्र पोलिसांकडे तक्रार केली किंवा पुन्हा माझ्याकडे आली नाहीस तर तुला जिवंत सोडणार नाही. अशी धमकी देऊन तो तिथून निघून गेला.
गावी पोहोचल्यानंतर घाबरलेल्या महिलेने संपूर्ण घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितले. पतीने आणि पीडित महिलेने बेगमपुरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस आरोपीचा शोध घेतला आणि त्याला नेवासा येथून अटक केली. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
घाटी परिसरातून महिलेचे अपहरण; पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन सलग दोन दिवस अत्याचार
Ans: इन्स्टाग्रामवरील चॅट आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन.
Ans: सुमारे 24 तासांहून अधिक काळ.
Ans: नेवासा येथून.






