फोटो सौजन्य : सोशल मीडिया
‘Business Today’ च्या एका अहवालानुसार, परिस्थिती इतकी विकोपाला गेली की, देशातील अनेक शहरांमध्ये विविध ‘क्विक-कॉमर्स’ प्लॅटफॉर्म्सवर म्हणजेच जसे की Blinkit, Zepto आणि Instamart यांच्यावर अवघ्या काही तासांतच ‘Melody’ टॉफींचा साठा पूर्णपणे संपला. तो out of stock झाला. एका रुपयापेक्षाही कमी किंमत असलेल्या या साध्याशा टॉफीने इंटरनेटवर अशी काही क्रेझ निर्माण केली, जी मोठ्यामोठ्या जाहिरातीमधून कधी साध्य झालं नाही.
बुधवारी, इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये पंतप्रधान मोदी त्यांना ‘मेलोडी’ टॉफी देताना दिसून आले. या व्हिडिओसोबतच त्यांनी लिहिले, “भेटवस्तूसाठी धन्यवाद.” या दोन्ही नेत्यांमध्ये दिसून आलेल्या सौहार्दाचे लोकांनी भरभरून कौतुक केले. यापूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्यांनी नमूद केले होते की, भारत आणि इटली यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
व्हिडिओ व्हायरल होताच, सोशल मीडियावर ‘Melodi’चा ट्रेंड पुन्हा एकदा जोर धरू लागला. लोकांनी या संदर्भात अनेक मजेशीर memes आणि पोस्ट्स शेअर केल्या. त्याच वेळी, हजारो वापरकर्त्यांनी तत्काळ आपली ॲप्स उघडून ‘Melody’ कँडीची ऑर्डर देण्यास सुरुवात केली. परिणामी, Blinkit, Zepto आणि Instamart यांसारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक ठिकाणी या कँडीचा स्टॉक संपला.
सध्या पंतप्रधान मोदी इटलीमध्ये दाखल झाले असून, त्यांच्या पाच युरोपीय देशांच्या दौऱ्याचा हा अंतिम टप्पा आहे. भारतीय आणि इटालियन अशा दोन्ही देशांतील प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या एका संयुक्त लेखात, मोदी आणि मेलोनी यांनी असे नमूद केले आहे की, हे दोन्ही देश आता केवळ मित्र राहिले नसून, त्यांचे रूपांतर strategic partners मध्ये झाले आहे. आगामी काळात तंत्रज्ञान, ऊर्जा आणि सामरिक क्षेत्रांमधील सहकार्यामुळे या दोन्ही राष्ट्रांमधील संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला आहे.
Meta Layoffs: पहाटेचा ईमेल 8000 लोकांची झोप उडवून गेला, Meta कडून एका झटक्यात मोठी नोकरकपात






