SEBI Approves 12 IPOs: SEBI कडून 12 IPO ला हिरवा कंदील; गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी (Photo Credit - X)
SEBI Approves 12 IPOs: येत्या काही दिवसात गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने १२ कंपन्यांच्या आयपीओला मान्यता दिली आहे. या कंपन्यांमध्ये इन्फ्रा. मार्केटची मूळ कंपनी हेला इन्फ्रा, पर्पल स्टाईल लॅब्स, जय जगदंबा, यूकेबी इलेक्ट्रॉनिक्स, सीएमआर ग्रीन टेक्नॉलॉजी, ट्रान्सलाइन टेक्नॉलॉजीज, मेडिकॅप हेल्थकेअर, ओसवाल केबल्स, बीव्हीजी इंडिया, साई पॅरेंटरल आणि सिफी इन्फिनिट स्पेसेस यांचा समावेश आहे. यामुळे गुंतवणूकदारांना नव्या संधी मिळणार आहे.
हे देखील वाचा: Gautam Adani Net Worth: अदानी समूहाला मोठा फटका! ‘या’ कारणांमुळे बाजारात अदानींची पडझड
या सर्व कंपन्यांनी जून ते ऑक्टोबर दरम्यान सेबीकडे त्यांचे आयपीओ कागदपत्रे सादर केल्या होत्या. टायगर ग्लोबलच्या सहकार्याने इन्फ्रा. मार्केट चालवणाऱ्या हेला इन्फ्रा यांनी ४,५०० ते ५,५०० कोटी किमतीचा आयपीओ प्रस्तावित केला आहे. हा आयपीओ नवीन शेअर्स आणि विद्यमान शेअरधारकांकडून विक्रीसाठी ऑफरचे मिश्रण असेल. पुढे सिफी टेक्नॉलॉजीजची उपकंपनी सिफी इन्फिनिट आहे, जी २,५०० कोटी रुपये किमतीचे नवीन शेअर्स आणि १,२०० कोटी किमतीची विक्रीसाठी ऑफर जारी करण्याची योजना आखत आहे.
हे देखील वाचा: PM Kisan Yojana: यंदाच्या अर्थसंकल्पात पीएम किसानचा निधी वाढणार? फेब्रुवारीत खात्यात येणार ‘इतका’ हप्ता
पर्निया पॉप-अप शॉपद्वारे लक्झरी फॅशन प्लॅटफॉर्म चालवणारी पर्पल स्टाईल लॅब्स केवळ नवीन शेअर इश्यूद्वारे ६६० कोटी उभारण्याची योजना आखत आहे. इतर कंपन्या देखील त्यांच्या आयपीओद्वारे नवीन भांडवल उभारण्याची किंवा विद्यमान शेअरधारकांना भागभांडवल विकण्याची योजना आखत आहेत. या मंजुरीनंतर, या कंपन्या त्यांची सार्वजनिक विक्री प्रक्रिया सुरू करू शकतात. नोएडा-आधारित इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनी यूकेबी इलेक्ट्रॉनिक्स ४०० कोटींचा नवीन इश्यू लाँच करणार आहे.






