(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
गेल्या आठवड्यात Share Market मध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी दबावाखाली राहिले. सेन्सेक्समधील पहिल्या १० कंपन्यांपैकी सहा मार्केट वॅल्यूमध्ये मोठी घसरण झाली आणि देशातील सर्वात मोठी मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांना सर्वात मोठे नुकसान भोगावं लागलं. या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना केवळ पाच दिवसांत ४०,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले, तर टाटा समूहाच्या TCS नेही गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान केलं. त्याच बरोबर आणखी 7 कंपन्यादेखील तोट्यात दिसल्या नेमका कसा राहिला परफॉर्मन्स समजून घेऊयात.
‘अर्धा हिस्सा तर भारताचाच…’, तेल व्यापारावर रशियन CEO यांचं मोठं विधान
गेल्या आठवड्यात शेअर बाजारातील मंदीच्या काळात, बीएसईचा ३०-शेअर सेन्सेक्स निर्देशांक ५३२ अंकांनी घसरला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी निर्देशांक १८१ अंकांनी खाली आला. दरम्यान, सेन्सेक्समधील पहिल्या १० कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या बाजार भांडवलात एकत्रितपणे १.२५ लाख कोटी रुपयांची घट झाली. रिलायन्स आणि टीसीएससह सात कंपन्यांना तोटा झाला असला तरी, घसरत्या बाजारातही तीन कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला.
गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य १७.४७ लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले आणि गुंतवणूकदारांना अवघ्या पाच दिवसांत ३९,७१८ कोटी रुपयांचे नुकसान झाले. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा समूहाची टीसीएस दुसऱ्या क्रमांकावर होती, जिचे बाजारमूल्य २०,१३५ कोटी रुपयांनी घसरून ७.९५ लाख कोटी रुपयांवर आले. केवळ या दोन कंपन्यांना पाच दिवसांत सुमारे ६०,००० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले.
केवळ रिलायन्स आणि टीसीएसच नव्हे, तर गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील इतर मोठ्या कंपन्यांनाही नुकसान झाले.
| कंपनी | नुकसान | मार्केट कॅपिटल |
|---|---|---|
| भारती एअरटेल | १८,७३६ कोटी | १०.९६ लाख कोटी रुपये |
| एल अँड टी | १६,८८० कोटी | ५.४४ लाख कोटी रुपये |
| LIC | १४,६११ कोटी | ५.०६ लाख कोटी रुपये |
| बजाज फायनान्स | ९,६८१ कोटी | ५.५४ लाख कोटी रुपये |
| HUL | ५,९०९ कोटी | ४.९८ लाख कोटी रुपये |
गुंतवणूकदारांना फायदा मिळवून देणाऱ्या तीन सेन्सेक्स कंपन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, एसबीआय, यादीत अव्वल स्थानी आहे. तिचे बाजार भांडवल ₹१२,६९२ कोटींनी वाढून ₹९.०२ लाख कोटी झाले. आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल ₹४,४८५ कोटींनी वाढून ₹९.०५ लाख कोटी झाले, तर एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल ₹४,१०१ कोटींनी वाढून ₹११.५१ लाख कोटी झाले.
बाजार भांडवलानुसार सर्वात मोठ्या कंपन्यांच्या क्रमवारीकडे पाहिल्यास, घसरण होऊनही मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज अव्वल स्थानी असून तिचे वर्चस्व कायम आहे. त्यानंतर अनुक्रमे एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, टीसीएस, बजाज फायनान्स, एलटी, एलआयसी आणि एचयूएल यांचा क्रमांक लागतो.






