Maharashtra Breaking News Updates Today
E20 इंधनाविरोधात एल्गार; ४ ऑगस्टला संसदेला टॅक्सी संघटनांचा घेराव
E20 Fuel Protest: टॅक्सी संघटना ई २० इंधनाविरोधात ४ ऑगस्ट रोजी संसदेला घेराव घालण्याची तयारी करत आहेत. जंतर मंतर येथे ३६ दिवस चाललेल्या विद्यार्थी आणि जनरेशन-झेड आंदोलनानंतर, आता इथेनॉलविरोधात एका मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू आहे. देशात २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ई२० इंधन) वापरण्यावाचत अखिल भारतीय पर्यटक परवाना टॅक्सी चालक आणि वाहतूकदारांचा असंतोष आता रस्त्यावर उतरत आहे. दिल्ली टॅक्सी आणि पर्यटक वाहतूकदार आणि टूर ऑपरेटर्स असोसिएशनने ई २० पेट्रोल धोरणे, वाहनांचे घटणारे मावलेज आणि कडक नियमांविरुद्ध निषेध करण्यासाठी ४ ऑगस्ट रोजी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.
27 Jul 2026 08:55 AM (IST)
Majhi Ladki Bahin Scheme: राज्य सरकारच्या अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेवरून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थी महिलांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. "लाडक्या बहिणींनी योजनेचे मिळणारे सर्वच १५०० रुपये केवळ शॉपिंगवर खर्च न करता, त्यातील काही रकमेची बचतही करावी," असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. वाशीम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, नव्याने उभारण्यात आलेल्या 'महिला व बालविकास भवना'च्या लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या.
27 Jul 2026 08:45 AM (IST)
MPSC Paper Leak: देशभरात गाजलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणाची उष्णता शांत होत नाही तोच, आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) भरती प्रक्रियेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 'एमपीएससी'मार्फत पार पडलेल्या औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती प्रक्रियेमध्ये मोठा गैरप्रकार आणि घोळ झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.
या भरती प्रक्रियेत अनियमितता आणि गैरप्रकार झाल्याचा दावा करत दोन बाधित उमेदवारांनी थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडे पुराव्यांसह लेखी तक्रार नोंदवली आहे. तक्रारदारांनी आपल्या अर्जात भरती प्रक्रियेतील संशयास्पद बाबींवर बोट ठेवले असून, या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी संपूर्ण भरतीची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची आग्रही मागणी केली आहे.
27 Jul 2026 08:40 AM (IST)
Exam Reform Bill 2026: देशभरात गाजत असलेल्या पेपरफुटीच्या प्रकरणांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने अखेर एक अत्यंत मोठे आणि कठोर पाऊल उचलले आहे. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध करणारे 'सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक २०२६' (Exam Reform Bill 2026) आज (२७ जुलै) लोकसभेत मांडले जाणार आहे. केंद्रीय कामगार आणि सार्वजनिक तक्रार निवारण राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह आज दुपारी १२ वाजता हे महत्त्वपूर्ण विधेयक सभागृहात सादर करतील.
27 Jul 2026 08:25 AM (IST)
Gold Rate Today: भारतात 27 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,492 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,284 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,869 रुपये आहे. भारतात 27 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,32,840 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,44,920 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,08,690 रुपये आहे. भारतात 27 जुलै रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 239.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,39,900 रुपये आहे.






