(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
दक्षिण कोरियाचे उद्योगपती आणि एसके ग्रुपचे अध्यक्ष चेय ताए-वॉन यांचा घटस्फोट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोल उच्च न्यायालयाने पूर्वी ठरलेल्या घटस्फोटाच्या तडजोडीची रक्कम कमी केली असली तरी, त्यांना त्यांची माजी पत्नी रोह सोह-योंग यांना अंदाजे ९४४ अब्ज वॉन म्हणजे अंदाजे ९४० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे ८,२०० कोटी रुपये म्हणजे तब्बल अंदाजे ८२ अब्ज रुपये इतके द्यावे लागतील. पण हे प्रकरण अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. दोन्ही पक्षांची इच्छा असल्यास, ते दक्षिण कोरियाच्या सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी अपील करू शकतात.
सेऊल उच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या तडजोडीची रक्कम ९४४ अब्ज वॉनपर्यंत कमी केली आहे.
ही रक्कम भारतीय चलनात अंदाजे ८,२०० कोटी रुपये (सुमारे ८२ अब्ज रुपये) आहे.
यापूर्वी, न्यायालयाने २०२४ मध्ये १.३८ ट्रिलियन वॉन देण्याचे आदेश दिले होते.
या हाय-प्रोफाईल प्रकरणाची बऱ्याच काळापासून ‘शतकातील घटस्फोट’ म्हणून चर्चा होत आहे.
या न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील केली जाऊ शकते.
न्यायालयाने हे मान्य केले की, लग्नाच्या काळात चेय ताए-वॉन यांच्या व्यावसायिक मालमत्तेत आणि संपत्तीत लक्षणीय वाढ झाली होती. तसेच, रोह सोह-योंग यांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन, मुलांचे संगोपन करून आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडून या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते, हेही न्यायालयाने मान्य केले. या आधारावर, न्यायालयाने असा निर्णय दिला की त्या व्यावसायिकाला वैवाहिक मालमत्तेचा मोठा हिस्सा मिळाला पाहिजे.
चेय ताए-वॉन हे दक्षिण कोरियाचे एक प्रमुख व्यावसायिक आणि एसके ग्रुपचे अध्यक्ष आहेत.त्यांच्या एसके हायनिक्स या कंपनीला AI क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे मोठा फायदा झाला आहे.त्यांच्या एकूण हिश्श्याचे मूल्य ५.५ अब्ज डॉलर्स असल्याचा अंदाज आहे. या जोडप्याचे लग्न १९८८ मध्ये झाले आणि त्यांना तीन मुले आहेत. २०१७ मध्ये घटस्फोटाची याचिका दाखल झाल्यापासून हा कायदेशीर वाद न्यायालयात सुरू आहे.
Air Suvidha 2.0 च्या नावाखाली ऑनलाईन घोटाळा! बनावट वेबसाईटवरुन पैशांची मागणी; सरकारने दिला इशारा






