पाकिस्तानने केली भारताची नक्कल? बनवली 'कॉकरोच अवामी पार्टी' ; पण एका चुकीमुळे उडाली खिल्ली
Pulwama हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानात ढेर; अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या झाडून हत्या
या प्रकरणाची सुरुवात भारताता काही आठवड्यांपूर्वी सुरु झाली होती. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका प्रकरणात बेरोजगार तरुणांची तुलना कॉकरोचशी केली होती. या व्यक्तव्यामुळे भारतातील तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली होती.
या निषेध म्हणून अमेरिकेत राहणाऱ्या अभिजित दिपके नावाच्या तरुणाने सोशल मीडियावर उपरोधात्मकपणे कॉकरोच जनता पार्टी स्थापन केली. याला सोशल मीडियावर बघता बघता चार दिवसांत तब्बल १५ मिलियन्स लोकांनी फॉलो करण्यास सुरुवात केली. ही संख्या भाजप आणि कॉंग्रेसच्या अधिकृत अकाऊंटपेक्षाही जास्त आहे. सध्या तरुणांचा हा नवीन पक्ष केवळ एक मीम न राहता देशातील बेरोजगार आणि निराश तरुणांचा आवाज बनला आहे.
दरम्यान भारतातील कॉकरोच जनता पार्टीची (CJP) लोकप्रियतान प्रचंड वाढली आहे. ही लोकप्रियता पाहून पाकिस्तानी तरुणांनी देखील आपल्या देशातील सत्ताधारी पक्षांना विरोध करण्यासाठी कॉकरोच अवामी पार्टी (CAP) तयार करुन सोशल मीडियावर पेजेस सुरु केले.
भारतात ही पार्टी एका निश्चित विचारसरणी, जाहीरनाम्याने अधिकृतरित्या तयार करण्यात आली होती. पण पाकिस्तानने कॉपी करण्यात घाई करत नियोजनाशिवाय वेगवेगळे व्हर्जन्स तयार केले. यामुळे आंदोलनाचा उद्देश भरकटला आणि केवळ एक थट्टेचा विषय बनला.
तसेच पाहायला गेले तर, दोन्ही देशांतील तरुण सध्या बेरोजगारी, खराब शासन आणि राजकीय व्यवस्थेला कंटाळलेले आङेत. भारतात या आंदोलनाला शिस्तबद्ध आंदोलनाचे रुप मिळाले आहे. तर पाकिस्तानात केवळ विस्कळीत नियोजन ज्याचा केवळ एक मीम बनला आहे.
CJP स्वत:ला भारतातील बेरोजगार, निराश तरुणांचे लीडर मानते. सोशल मीडियाच्या माध्यमातून महत्त्वाच्या मुद्द्यावर CJP ने सरकारला धारेवर धरले आहे. तरुणांसाठी दर्जेदार शिक्षण, आरोग्य सेवा, रोजगाराच्या संधी, सरकारी परिक्षा पद्धतींमध्ये सुधारणा, नोकरशाह आणि सरकारी अधिकाऱ्यांची जबाबदारी या विषयांवरुन सरकारकडे जाब मागितला आहे.
Pulwama हल्ल्याचा बदला? मास्टरमाइंड हमजा बुर्हान ठार; हत्येमागे भारताच्या ‘या’ कुख्यात गँगचा हात?






