टरिफचा तडाखा? उत्पादन क्षेत्रात मंदीचे सावट..; पीएमआय नऊ महिन्यांच्या नीचांकीवर (फोटो-सोशल मीडिया)
एचएसबीसी येथील मुख्य भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रांजल भंडारी यांनी या मंदीचे मुख्य कारण म्हणून यूएस टॅरिफचा उल्लेख केला. अहवालानुसार, नवीन निर्यात ऑर्डरमधील वाढ एका वर्षातील सर्वात कमी होती आणि निर्देशांक १३ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. कंपन्यांनी सकारात्मक आंतरराष्ट्रीय विक्री ट्रेंड असलेले देश आफ्रिका, आशिया, युरोप आणि मध्य पूर्वेतील उच्च विक्री नोंदवले असले तरी, एकूण वाढ थोडीशी मंदावली. भंडारी यांनी नमूद केले की, नोव्हेंबरमध्ये भाव उत्पादनाच्या अपेक्षा (व्यवसाय आत्मविश्वास) लक्षणीयरीत्या कमी झाल्या आहेत, ज्यामुळे टॅरिफच्या परिणामांबद्दल वाढत्या चिंता समोर येत आहे.
हेही वाचा : Indian Auto Sector Sales: नोव्हेंबरमध्ये ऑटो सेक्टरची झेप! सर्व कंपन्यांच्या विक्रीत जबरदस्त वाढ
उत्पादन क्षेत्रातील वाढत्या चिंतेच्या पाश्र्वभूमीवर, वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी २८ नोव्हेंबर रोजी सांगितले की भारताला या वर्षींच अमेरिकेसोबत व्यापार करार अपेक्षित आहे, ज्यामुळे भारतीय निर्यातदारांसाठी टॅरिफचा प्रश्न सुटेल, ट्रम्प प्रशासनाने भारतीय निर्यातीवर टॅरिफ लादल्यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार करार रखडला आहे. द्विपक्षीय व्यापार कराराला वेळ लागू शकतो, परंतु भारत अमेरिकेसोबत एका अंतरिम चौकटीवर व्यापार करारात गुंतलेला आहे. जो परस्पर टॅरिफ आव्हान सोडवेल. नोव्हेंबरमध्ये महागाई कमी झाली.
कच्या मालाचा खर्च नऊ महिन्यांतील सर्वांत कमी वेगाने वाढला आणि विक्री शुल्क आठ महिन्यांतील सर्वांत कमी वेगाने वाढले, नवीन ऑर्डर वाढीतील मंदीच्या प्रतिसादात उत्पादन क्षेत्राने या २१ महिन्यांच्या सतत वाढीच्या कालावधीत रोजगार वाढ सर्वांत मंद होती. पुढील १२ महिन्यांत उत्पादन वाढेल, असा कंपन्यांचा विश्वास सकारात्मक राहिला, परंतु ही सकारात्मक भावना तीन वर्षांहून अधिक काळातील सर्वांत कमी पातळीवर पोहोचली, अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून वाढत्या स्पर्धेसह स्पर्धात्मक परिस्थितीमुळे निराशावादी अंदाज व्यक्त करण्यात आले.






