(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान सध्या त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. मात्र, लग्नसोहळ्यातील एका वेगळ्याच गोष्टीने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या खासगी समारंभातील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असताना, आमिरच्या पायात दिसलेल्या पैंजणसदृश दागिन्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
लग्नानंतर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आमिर खान आयव्हरी रंगाचा धोतर-कुर्ता परिधान करून पाहुण्यांचे स्वागत करताना दिसतो. विशेष म्हणजे, इतर पाहुणे पादत्राणे घालून असताना आमिर अनवाणी दिसतो. त्याच्या घोट्याभोवती असलेल्या जाड दागिन्याकडे नेटकऱ्यांचे लक्ष गेले आणि अनेकांनी तो पैंजण असल्याचा अंदाज व्यक्त केला.
View this post on Instagram
हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर मजेशीर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला. एका युजरने, “खरा घुंगरू सेठ!” अशी प्रतिक्रिया दिली. दुसऱ्याने, “आता पाय बांधले आहेत, त्यामुळे पुन्हा लग्न करणार नाही,” अशी मिश्कील टिप्पणी केली. तर आणखी एका युजरने, “हा कोणत्या ग्रहावरून आला आहे?” असा प्रश्न विचारला. काहींनी “हे कलियुग आहे,” अशीही गंमतीशीर प्रतिक्रिया व्यक्त केली.
View this post on Instagram
दरम्यान, इरफान पठाण याने सोशल मीडियावर आमिरच्या लग्नाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आमिर आणि त्याची पत्नी गौरी स्प्रॅट विवाहानंतर एकत्र डान्स करताना दिसतात. याशिवाय आमिर गौरीच्या हाताची किस घेत तिला प्रेमाने मिठी मारतानाही दिसतो. या खास क्षणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.






