फोटो सौजन्य- सोशल मीडिया
JEE Advanced Girl Topper 2026 Aarohi Deshpande: नुकताच जेईई ॲडव्हांस्ड २०२६ निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी १७ मे २०२६ रोजी जेईई ॲडव्हांस्ड २०२६ रोजी झालेल्या या परीक्षेला १,८७,३८९ एकूण उमेद्वारांनी नोंदणी केली होती. ज्यापैकी ५६,८८० उमेद्वार उत्तीर्ण झाले असून यामध्ये १०,१०७ महिला उमेद्वारांचा समावेश आहे. ऑल इंडिया रँकमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे शुभम कुमार हे बिहारमधील गया येथील रहिवासी असून त्यांना आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. तर दुसरीकडे महिलांमध्ये आरोही देशपांडे या टॉप रॅंकर आहेत. चला तर मग जाणून घेऊया जेईई ॲडव्हांस्डच्या महिला टॉपर आरोही देशपांडे या कोण आहेत? आणि त्या कुठल्या रहिवासी आहेत?
जेईई ॲडव्हांस्ड परीक्षा २०२६ ची महिला टॉपर आरोही देशपांडे यांनी ऑल इंडिया रँकिंगमध्ये ७७ वी रँक (AIR 77) मिळवली असून त्यांनी दिल्ली झोनमधून जेईई ॲडव्हांस्ड परीक्षा दिली होती. त्यांना ३६० पैकी २८० गुण मिळाले आहेत. त्यांनी जेईई मेन परीक्षेतही उत्तम यश संपादन केले होते, त्यादरम्यान त्यांची ऑल इंडिया रँक ९९ वी होती.
JEE Advanced Result 2026: आज सकाळी १० वाजता निकाल; तुमची रँक कशी तपासणार?
जेईई अडव्हांस्डची टॉपर वि्दयार्थिनी आरोही देशपांडे या महाराष्ट्रातील पुण्याच्या रहिवासी आहेत. जेईई परीक्षेच्या तयारीसाठी त्या गेली चार वर्षांपासून राजस्थानमधील कोटा येथे राहत होत्या. येथील एलन (Allen) कोचिंगमधून त्यांनी आपली तयारी केली आहे.
आरोही यांनी आपल्या अभ्यासाचे नियोजन आणि यशाची रणनीती स्पष्ट करताना सांगितले की, त्या सुट्ट्यांच्या दिवशी आणि रविवारी अतिरिक्त वेळ काढून आपला अभ्यासक्रम पूर्ण करायच्या. ज्या प्रकरणांचा अभ्यास करायचा राहून जायचा, त्यांच्यासाठी त्या वेळ निश्चित करायच्या. नियमित उजळणीसोबत त्या नोेट्स तयार करायच्या, ज्यामुळे त्यांना अभ्यास करणे सोपे जायचे. तसेच त्यांनी कलर कोडींग तंत्राचा वापर करून केमिस्ट्रीच्या नोट्स तयार करत असत.
अभ्यासादरम्यान जर काही कारणास्तव जसे की तब्येत बिघडल्याने किंवा इतर परिस्थितींमुळे त्यांचा एखादा क्लास चुकला तर त्या निराश न होता हुकलेला अभ्यासक्रम पूर्ण करायच्या. सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि पूर्ण लक्ष केंद्रीत करून त्यांनी आपली तयारी केली, ज्यामुळे त्या आज यशस्वी बनल्या आहेत.






