फोटो सौजन्य- सोशल मीडिया
JAC Delhi Counseling 2026: दिल्लीतील प्रमुख सरकारी अभियांत्रिकी (Engineering) महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यंसाठी एक आनंदाची बातमी आहे. संयुक्त प्रवेश समितीने म्हणजेच ‘जॅक दिल्ली’ने (Joint Admission Committee – JAC Delhi) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बी.टेक (B.Tech) आणि बी.आर्क (B.Arch) कोर्सेसच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. याला जेईई मेन २०२६ (JEE Main 2026) परीक्षा दिलेले विद्यार्थी आता अधिकृत पोर्टलद्वारे अर्ज करू शकतील.
‘जॅक दिल्ली २०२६’ साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आणि चॉईस फिलिंग (Choice Filling) प्रक्रिया (२८ मे २०२६) आज सकाळी १० वाजल्यापासून सुरू होईल. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ जून २०२६ रोजी रात्री ११:३० निश्चित करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी विद्यार्थ्यानी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
जॅक दिल्ली कौन्सिलिंग २०२६ च्या माध्यमातून पाच प्रमुख तांत्रिक संस्थांमध्ये प्रवेश दिला जाईल
जॅक दिल्ली कौन्सिलिंग २०२६ मधील प्रवेश प्रक्रिया जेईई मेन २०२६ च्या रँकवर आधारित असेल. येथे प्रवेश घेण्यासाठी बी.टेक आणि बी.आर्क दोन्ही अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र पात्रता नियम लागू असतील. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी १,५०० रुपये नॉन रिफंडेबल (परत न मिळणारे) नोंदणी शुल्क जमा करावे लागेल. या फीचे पेमेंट केवळ ऑनलाइन माध्यमातूनच करता येईल. अधिक माहितीसाठी उमेद्वारांनी jacdelhi.admissions.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे.
कौन्सिलिंग प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्याना अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता भासेल. यामध्ये खालील कागदपत्रांचा समावेश आहे,






