(फोटो सौजन्य: chatgpt)
आता गावागावांत नवे उद्योजक घडणार, MACCIA चा ऐतिहासिक निर्णय! काय आहे हब-अँड-स्पोक मॉडेल?
१ जुलै २०२६ पर्यंत, AI मुळे नोकरी गमावणाऱ्या जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या १,२८,००० पेक्षा जास्त झालेली असेल. संपूर्ण वर्ष २०२५ मध्ये एकूण १,२५,००० आयटी व्यावसायिकांना कामावरून कमी करण्यात आले. ज्या वेगाने कंपन्या ऑटोमेशन आणि नवीन AI साधने स्वीकारत आहेत, त्यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की हा ट्रेंड थांबणार नाही. पुढा हा धोका आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.
संपूर्ण जगाच्या आकडेवारीचा विचार करता भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जानेवारी 2020 पासून जुलै 2026 पर्यंत्या आकडेवारीचा विचार केला असता AI वर आधारित टेक-ले ऑफमध्ये अमेरिका जास्त प्रभावित आहे. आतापर्यंत ज्या कर्मचाऱ्यांना हातात नारळ दिला आहे त्यात अमेरिकेचे कर्मचारी 71.33 % इतके आहेत. भारतात नोकरी गमावणारे कर्मचारी 7.16 टक्के इतके आहेत. भारतानंतर जर्मनीचा नंबर लागतो. ज्याचा 3.43 % इतका रेट आहे आणि त्यानंतर ब्रिटनचा नंबर लागतो ज्याचा रेट 2.64% इतका आहे.
भारतातील AI चा प्रभाव सर्व क्षेत्रांमध्ये एकसारखा राहिलेला नाही. या तंत्रज्ञानाचा काही विशिष्ट क्षेत्रांतील मनुष्यबळावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. AI मुळे ज्या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक नोकऱ्या गेल्या आहेत, त्यांमध्ये खालील क्षेत्रांचा समावेश आहे:
एजुकेशन सेक्टर : या क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला असून, एकूण नोकऱ्यांच्या नुकसानीपैकी २१.६७% नुकसान या क्षेत्रात झाले आहे.
फाइनेंस सेक्टर: बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रात १४.७३% नोकऱ्या होत्या.
फूड इंडस्ट्री: फूड टेक आणि डिलिव्हरी क्षेत्रात १२.२६% नोकऱ्या गेल्या.
ट्रांसपोर्ट आणि कंज्यूमर बिजनेस: या दोन क्षेत्रांमधील सुमारे ११% कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले.
इतिहासाप्रमाणेच, AI मुळे निर्माण झालेले नोकरीचे संकट दरवर्षी अधिकच गडद होत आहे. २०२० मध्ये, अंदाजे ८१,००० कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या, हा आकडा २०२२ मध्ये वाढून १,६५,००० झाला. २०२३ मध्ये, नोकरकपातीने २,६६,००० चा आतापर्यंतचा उच्चांक गाठला. २०२४ आणि २०२५ मध्ये काहीसा दिलासा मिळाला असला तरी, २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांतच मागील वर्षाचा विक्रम मोडला गेला आहे.






