फोटो सौजन्य - Social Media
राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड (RCFL)ने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती. २१ मार्च २०२५ पासून या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार होते. अर्ज ५ एप्रिल २०२५ पर्यंत करता येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदे भरण्यात येणार आहेत. या पदांमध्ये Operator Trainee (Chemical) पदासाठी ५४ जागा, Technician (Mechanical) Trainee पदासाठी ८ जागा, Technician Trainee (Instrumentation) पदासाठी ४ जागा, Boiler Operator Grade III पदासाठी ३ जागा, Junior Fireman Grade II आणि Technician (Electrical) Trainee पदासाठी प्रत्येकी २ जागा तर Nurse Grade II पदासाठी १ जागा रिक्त आहे. या पदासांठी काम करण्यास इच्छुक उमेदवार ५ एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात.
उमेदवारांना या भरतीसाठी काही रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरावी लागणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच महिला उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही आहे. OBC (Non-Creamy Layer) या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून एकूण ७०० रुपयांची भरपाई करावी लागणार आहे. यात कोणतीच रक्कम Refund होणार नाही, उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात हे अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी काही पात्रात निकषांना पात्र करावे लागणार आहे.
प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता निकष विभिन्न आहेत. ऑपरेटिंग ट्रेनी पदासाठी उमेदवार B.Sc. (Chemistry) + NCVT AO(CP) ट्रेड OR डिप्लोमा इन केमिकल इंजिनीरिंग हवा. बॉयलर ऑपरेटर ग्रेड III पदासाठी उमेदवार SSC + सेकंड क्लास बॉयलर अटेंडंट सर्टिफिकेट + २ वर्षांचा अनुभव या निकषांना पात्र हवा. ज्युनिअर फायरमन ग्रेड २ पदासाठी उमेदवार SSC + फायरमन सर्टिफिकेट + हेवी वेहिकल ड्रायविंग लायसन्स + १ वर्षांचा अनुभव या निकषांना पात्र हवा.
नर्स ग्रेड २ पदासाठी अर्ज कर्ता उमेदवार B.Sc. Nursing / GNM + हॉस्पिटलमध्ये २ वर्षांचा अनुभव या निकषांना पात्र असणे अनिवार्य आहे. या संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. वयोमर्यादे संदर्भात असणाऱ्या अटीनुसार, SC तसेच ST प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना आयुमर्यादा ३५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तर OBC नॉन क्रिमी लेयर प्रवर्गातील उमेदवारांसाठी हे निकष ३३ वर्षे इतके निश्चित करण्यात आले आहे. लवकरात लवकर अधिसूचनेचा आढाव घेत अर्ज करण्यात यावे.