फोटो सौजन्य - Social Media
अकोला प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या कार्यक्षेत्रातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांमधील पात्र विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका तसेच शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता ५ वी, ६ वी, ७ वी आणि ८ वी मध्ये शिक्षण घेत असलेले अनुसूचित जमातीचे विद्यार्थी या प्रवेश परीक्षेस पात्र असतील.
या प्रवेश परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज संबंधित शाळांचे मुख्याध्यापक यांनी भरून घ्यावेत. भरलेले अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या कार्यालयाकडे मुख्याध्यापकांमार्फत सादर करणे आवश्यक आहे.
विहित नमुन्यातील अर्ज आदिवासी शासकीय/अनुदानित आश्रमशाळांचे मुख्याध्यापक किंवा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला येथे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे भरलेले अर्ज ३० जानेवारी २०२६ पर्यंत सादर करणे बंधनकारक आहे.
अर्ज सादर करताना विद्यार्थ्यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. त्यामध्ये






