सौजन्य - सोशल मिडीया
सातारा : महिलेवर छळ होण्याच्या अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत. अशातचं आता सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वडिलांकडून चारचाकी गाडीसाठी पाच लाख रुपये घेवून आली तरच शरीर संबंध ठेवणार, असे सांगत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात पत्नी सरोज चेतन भोसले (वय ३०, रा. भवानी पेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. पती चेतन नारायण भोसले (वय ३४), सासरे नारायण बापूराव भोसले, सासू रेखा नारायण भोसले (सर्व रा. गुरुवार पेठ, सातारा), नणंद शलाका रितेश जगदाळे, नंदावा रितेश चंद्रकांत जगदाळे (रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा), लग्न जमावणारे शिंदे काका (पूर्ण नाव माहिती नाही, रा. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीत नमूद केले आहे की, दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ रोजी रामाचा गोट येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात हिंदू धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे पती चेतन याच्याशी लग्न केले. फिर्यादी व त्यांच्या आईवडिल, नातेवाईकांची जाणीवपूर्वक फसवणूक करत लग्नात सुमारे ८ लाख रुपये खर्च करण्यास भाग पाडले. सहायक पोलीस निरीक्षक केणेकर तपास करत आहेत.
धमकावून पैशांची मागणी
पती चेतन हा फिर्यादीला तू शरीर संबंध प्रस्तापित करण्यास शारीरिकदृष्ट्या अपात्र आहे, चारचाकी गाडी घेण्यासाठी आणखी पाच लाख रुपये वडिलांकडून आण, तरच शरीर संबंध ठेवेन, असे धमकावून पैशांची मागणी करत होता. क्रुरतेची वागणूक देत शारीरिक व मानसिक छळ करत होता, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हे सुद्धा वाचा : पंचगंगा नदीवरील जुन्या पुलाची दूरवस्था; धोकादायक वळणावर ट्रक पलटी
सासरच्यांकडून विवाहितेचा छळ
महिलेवर छळ होण्याच्या अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत. दरम्यान गेल्या काही महिन्याखाली एका बेरोजगार तरुणाने व्यावसायिक असल्याची बतावणी करून सुशिक्षित तरुणीची व तिच्या कुटुंबीयांची फसवणूक केली. त्यानंतर या तरूणीशी लग्न केले. लग्नानंतर तो तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होता. सासू-सासरेही माहेरून 50 हजार रुपये आणण्यासाठी सतत त्रास देत होते. लग्नाच्या 70 दिवसांतच पती व सासू-सासऱ्याकडून होत असलेल्या छळाला कंटाळून पीडितेने गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पीडित रेशमी (वय 23) च्या तक्रारीवरून पती नीरज वाघमारे (वय 26), सासरा शिवराजसिंग वाघमारे (वय 60), सासू माधुरी वाघमारे (वय 55, रा. काटोल रोड) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.