कुरुंदवाड पोलिसांकडून अवैध धंद्यावर कारवाई सुरुच; एकाच दिवशी...
पिंपरी : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोेर आली आहे. हिंजवडी मधील लक्ष्मी चौकाजवळ सार्वजनिक ठिकाणी तिघेजण आरडाओरडा करत असल्याने त्यांना समजावण्यासाठी हिंजवडी पोलीस गेले. त्यावेळी तिघांनी एका पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शुक्रवारी (२ मे) रात्री घडली आहे.
नवनाथ बबन गवारी (४२, मान, मुळशी), रवी उत्तम माने (३५, वाकड), महेश दिनकर साबळे (३४, मुळशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत सूर्यवंशी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत सूर्यवंशी शुक्रवारी रात्री हिंजवडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी लक्ष्मी चौकाजवळ आरोपी आरडाओरडा करत होते. सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याने पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी आरोपींना समजावण्यासाठी गेले. त्यांना समजावून सांगत असताना आरोपी सूर्यवंशी यांच्या अंगावर धावून गेले. त्यांना दगड फेकून मारला. आम्ही गाववाले आहोत, ही आमची जागा आहे. आम्ही काहीही करू, तू कोण आम्हाला सांगणारा, असे म्हणत आरोपींनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.