काय घडलं नेमकं?
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथील विद्यार्थ्यांची सहल कोकणात आली होती. सहल संपल्यानंतर बस रात्री उशिरा नाशिककडे परतण्यासाठी निघाली. पहाटेच्या सुमारास बस वाठार परिसरात पोहोचली. तेव्हा चालकाचा रस्त्याचा अंदाज चुकला. महामार्गावर काम सुरु असतांना रस्त्याच्या कडेला मोठी खोल दारी सारखी जागा निर्माण झाली होती. चालकाला ती जागा दिसली नाही आणि बस थेट त्या दिशेला घसरत थेट दरीत कोसळली.
अचानक बस दरीत कोसळल्याने बसमधील विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. बस कोसळल्यानंतर क्षणभर विद्यार्थ्यांना काय घडले ते समजायलाच वेळ लागला. हा धक्का इतका जोरदार होता की बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चुरडा झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले आणि तातडीने बचावकार्य सुरु केले. त्यानंतर महामार्ग पोलीस पथकाने घटनास्थळी दाखल होऊन सर्व जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढले. जखमींना तातडीने कराड उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले तर काही विद्यार्थ्यांना अधिक उपचारांसाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या घटनेत ३० ते ३२ विध्यार्थी जखमी झाले आहेत, तर चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर उपचार सुरु आहे. यात कोणतीही जीवित हानी झाली नसून बस कशी कोसळली? या मगच कारण काय? याचा तपास पोलीस करत आहे. या अपघातामुळे वाठार परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. जखमी विद्यार्थ्यांचे पालक रुग्णालयात दाखल झाले आहे.
Ans: कराड तालुक्यातील वाठार गावाजवळ बस 20 फुट खोल खड्ड्यात कोसळली.
Ans: 30 ते 32 विद्यार्थी जखमी असून त्यापैकी 4 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे.
Ans: रात्रीच्या वेळेत रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे कडेला खोल खड्डा तयार झाला होता; चालकाचा अंदाज चुकल्याने बस त्यात घसरली.






