काय घडलं नेमकं?
२३ जूनला रात्रीच्या सुमारास पालेगाव परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय संबंधित तरुणीच्या चुलत्याला होता. याच कारणावरून तरुणीच्या चुलत्याने त्याच्या साथीदारांनी पीडित तरुणाचे फिटनेस जिमसमोरून अपहरण केले. त्यानंतर त्याला एका मोकळ्या मैदानात नेऊन लोखंडी रॉड, बांबू आणि चाकूच्या साहाय्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला. मात्र तरुणाला तातडीने उपचारासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र १ जुलै रोजी सायंकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.
Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?
नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड
मारहाण करणारे आरोपी नगरसेविकेशी संबंधित असल्याचा आरोप करत त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. मात्र नगरसेवक पूनम पाटील यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. यानंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याला घेराव घातला. सर्व आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा ओमचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
पाच आरोपी अटकेत
पोलिसांनी ग्रामस्थांसोबत चर्चा केली. आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित संशयित आरोपींचा शोध सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
दीड महिन्यांपूर्वीच झाले लग्न; घरात CCTV, शेजाऱ्यांशी बोलल्याने मारहाण, 26 वर्षीय महिलेचं टोकाचं पाऊल
अंबरनाथ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड महिन्या पूर्वीच झाले होते लग्न. पत्नीवर पाळत ठेवण्यासाठी डॉक्टर पतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावले. शेजाऱ्यांशी बोलली म्हणून बेदम मारहाण करण्यात आली. अखेर सासरच्या छळाला कंटाळून २६ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात डॉक्टर पतीला अटक करण्यात आली आहे. तर सासू आणि दीर यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
Ans: प्रेमसंबंधाच्या संशयातून त्याचे अपहरण करून लोखंडी रॉड, बांबू आणि चाकूने अमानुष मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Ans: संतप्त नागरिकांनी पोलिस ठाण्याला घेराव घातला, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आणि भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयाची तोडफोड केली.
Ans: पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला असून इतर संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.






