धक्कादायक ! बैल विकून आलेले पैसे न दिल्याने बाप-लेकात वाद; काठीने मारहाण करून बापाची हत्या (संग्रहित फोटो)
वडगाव मावळ : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता मावळमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मावळ तालुक्यातील पारवडी गावात दोघांनी मिळून एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करत त्याचा खून केला आहे. ही घटना बुधवारी (दि. ५) रात्री उघडकीस आली आहे.
सागर बाबू रोकडे (वय ५२, रा. पारवडी, ता. मावळ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोन्या उर्फ सुनील ऋषिनाथ काटकर व संकेत ऋषिनाथ काटकर (दोघे रा. पारवडी, ता. मावळ) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी पहाटे आरोपी आणि सागर रोकडे यांचे किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्या कारणावरून आरोपींनी सागर यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी व काठ्यांनी मारहाण करत ठार मारले. त्यानंतर सागर रोकडे यांचा मृतदेह त्यांच्या घरात आणून ठेवला. बुधवारी रात्री ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी सोन्या काटकर याला अटक केली आहे. कामशेत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : गुन्हेगारांमध्ये खळबळ! माळेगाव पोलीस अॅक्शन मोडवर; तिघांवर थेट तडीपारची कारवाई
जेलमधून बाहेर आला अन् तिघांना तोडला
गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली. एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.
ग्राहकाचा भाजी विक्रेत्यावर चाकूने हल्ला
गेल्या काही दिवसाखाली खरेदी करताना झालेल्या वादातून ग्राहकाने भाजी विक्रेत्यावर चाकूने वार केल्याची घटना खडकीतील संजय गांधी भाजी मंडईत घडली आहे. मनोज स्वामी (रा. इंदिरानगर, खडकी) असे गु्न्हा दाखल केलेल्या ग्राहकाचे नाव आहे. या हल्ल्यात भाजी विक्रेते शौकत बाबामियाँ (वय ३६) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.