तरुणीचं अंदाजे वय 25 ते 27 वर्षे
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करत प्राथमिक तपास सुरु केला आहे. प्राथमीक तपासात सदर तरुणीचे वय अंदाजे 25 ते 27 वर्षे असल्याचे समोर आले आहे. मृत तरुणीची अद्याप ओळख पटलेली नाही आहे. मृतदेहाची अवस्था पाहता हत्या अतिशय क्रूरपणे करण्यात आल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्याचा काम करत असून आरोपींचा शोध घेत आहे.
गुन्हा दाखल
या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिक प्रभावीपणे करण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण केले आहे. तसेच, श्वान पथकाची मदत घेण्यात येत असून, आरोपीचा माग काढण्यासाठी विविध पातळ्यांवर तपास सुरू आहे. घटनास्थळावरून आवश्यक नमुने गोळा करून त्यांची तपासणी केली जात आहे.
पाच विशेष पथकांची नेमणूक
अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादर यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितले की, आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच विशेष पोलीस पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य टेक्निकल टूल्सच्या सहाय्याने तपास वेगाने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक शक्य त्या दिशेने तपास करण्यात येत असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Ans: बारामती तालुक्यातील सुपा, खैरेपाडळ परिसरात.
Ans: नाही, अद्याप मृत तरुणीची ओळख पटलेली नाही.
Ans: पाच विशेष पोलीस पथके, फॉरेन्सिक तज्ज्ञ, श्वान पथक व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.






