काय नेमकं प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २९ जून रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित विवाहिता आपल्या गावातील रस्त्याच्या कडेला उभी असताना आरोपी नानासाहेब शिवाजी बिक्कड हा जीप घेऊन तेथे आला. त्याने विवाहितेजवळ जाऊन तिच्यासोबत अश्लील वर्तन करत विनयभंग केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली.
तीन महिन्यांपासून त्रास सुरू असल्याचा आरोप
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी गेल्या तीन महिन्यांपासून तिला सातत्याने त्रास देत होता. त्याने फोन करून तिच्याकडे अनैतिक संबंधांची मागणी केली होती. मात्र, महिलेने त्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर आरोपीने तक्रार केल्यास पती, सासरा आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात पाठवण्याची धमकीही दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून नानासाहेब शिवाजी बिक्कड याच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात विनयभंगासह संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीच्या भूमिकेचा सखोल तपास केला जात आहे.
बीडमध्ये मध्यरात्री थरार! किरकोळ वादातून 21 वर्षीय तरुणाचा चाकूने निर्घृण खून
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे मध्यरात्री किरकोळ वादाचे रूपांतर रक्तरंजित हत्याकांडात झाले. साठे चौकात काही जणांनी 21 वर्षीय ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे याच्यावर धारदार चाकूने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केली. या हल्ल्यात त्याचा एक मित्र गंभीर जखमी झाला असून, दुसऱ्या मित्राने प्रसंगावधान राखत घटनास्थळावरून पळ काढल्याने त्याचा जीव वाचला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
Ans: केज तालुका, बीड.
Ans: विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी.
Ans: आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.






