Chandrapur News: निकृष्ट सोयाबीन बियाण्यांचा फटका! 60 हेक्टरवरील पीक धोक्यात, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
सातारा जिल्हा बँक निवडणूक पूर्वतयारीने तालुक्यातील वातावरण ढवळले; ठरावांसाठी बैठकांचे सत्र सुरू
कृषी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, वरोरा तालुक्यात ३, भद्रावती तालुक्यात १६ आणि चिमूर तालुक्यात १८ अशा एकूण ३७ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने कृषी अधिकाऱ्यांनी शेतांची पाहणी केली असता अनेक ठिकाणी सोयाबीनचे उगवण प्रमाण अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आले. (फोटो सौजन्य – AI Created)
प्राथमिक आकडेवारीनुसार वरोरा तालुक्यात ४ हेक्टर क्षेत्र (१२ बॅग), भद्रावती तालुक्यात २२ हेक्टर क्षेत्र (५४ बंग) आणि चिमूर तालुक्यात ३४ हेक्टर क्षेत्र (१११ बॅग) अशा एकूण ६० हेक्टर क्षेत्रावर १७७ बॅग बियाण्यांचा परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचा अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, पावसाचा अनिश्चितपणा आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी अडचणीत असताना या प्रकाराने त्यांची चिंता आणखी वाढली आहे.
तक्रारींच्या विश्लेषणातून बुस्टर कंपनीच्या ‘हुतुतू’ या सोयाबीन वाणाविरोधात सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय इनोवज (महादेव), महागुजरात आणि हनीबेझर या कंपन्यांच्या बियाण्यांबाबतही उगवण न झाल्याच्या किंवा अत्यल्प उगवण झाल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. दरम्यान, कृषी विभागाने संबंधित बियाण्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. संबंधित कंपन्यांकडून आवश्यकतेनुसार गार्ड सॅम्पल मागविण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत अंतिम निष्कर्ष स्पष्ट होणार आहे.
कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली असता संशयित बियाण्यांचा कोणताही साठा आढळून आला नाही. संबंधित बियाण्यांची संपूर्ण विक्री झाल्याचे कृषी केंद्र चालकांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. दरम्यान, बाधित शेतांचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्याआधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. मात्र, आजपर्यंत वरोरा उपविभागात बोगस किंवा निकृष्ट बियाण्यांची विक्री करणाऱ्या कोणत्याही कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे प्रयोगशाळेचा अहवाल आणि पुढील प्रशासकीय कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तज्ज्ञांच्या मते, प्रयोगशाळेच्या अहवालात बियाणे निकृष्ट असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कंपन्यांवर बियाणे कायद्यानुसार कारवाई होण्याबरोबरच बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
Maharashtra IMD Alert: विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय? मुंबईसह ‘या’ ९ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार पाहणी केली जात आहे. तालुकास्तरीय कमिटी हा अहवाल तयार करते. त्यांच्या अहवालानंतरच कारवाई शक्य आहे. बियाण्यांच्या एका बॅगची किंमत ४ ते ४५०० रुपये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.






