नेमकं प्रकरण काय?
विलास उदावंत (रा. पंडितनगर, नगररोड, बीड) असे आरोपीचे नाव आहे. तो बीडमध्ये ‘विलास ज्वेलर्स’ नावाचे दुकान चालवत होता. जलद श्रीमंत होण्यासाठी त्याने स्वतः १६ बनावट ग्राहक तयार केले. या ग्राहकांना बनावट सोने देऊन त्याने ते बैंक ऑफ बडोदा या बँकेत गहाण ठेवले. सोन्याचे परीक्षण करणारा म्हणून त्याने हे बनावट सोने ‘खरे’ असल्याचे भासवून बँकेची फसवणूक केली. याचबरोबर, त्याने सामान्य लोकांना जास्त सोन्याचे आमिष दाखवून त्यांचीही फसवणूक केली आणि सर्व मिळून अडीच कोटी रुपये जमा करून तो येथील प्रॉपर्टी विकून पसार झाला होता.
पोलिसांची धडक कारवाई
याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तो पुण्यातील देहू गाव येथे ‘व्यंकटेश ज्वेलर्स’ नावाने दुकान चालवत असल्याचे समोर आले. मोबाईल लोकेशन वरून पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि पुण्यातून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या तांब्यातून १८ किलो सोने- चांदी जप्त करण्यात आली. पोलिसांनी नागरिकांना अशा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे, तसेच बँकांना सोन्याचे परीक्षण करणाऱ्याची पूर्ण खात्री करून घेण्याची सूचना दिली.
Jalna: संभाजीनगर बोर्डखाली केली लघुशंका, ठरला ट्रोलिंगचा बळी, २८ वर्षीय तरुणाची आत्महत्या






