मरण स्वस्त होतेय? वाहनचालकांचा बेशिस्तपणा; पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू
काय नेमकं प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीएसएम फॉइल्स लिमिटेडचे भागीदार सागर गिरीश भानुशाली आणि मोहनसिंह लक्ष्मणसिंह परमार यांच्यात व्यावसायिक भागीदारी होती. शेअर बाजारातील मोठ्या तोट्यामुळे सागर भानुशाली आर्थिक अडचणीत सापडला होता. त्यानंतर त्याने परमार यांना कंपनीतील हिस्सेदारी विकण्यास प्रवृत्त केले. या व्यवहारातून सुमारे ₹३२ कोटींची रक्कम देण्यात आली होती. मात्र, ही रक्कम परत करावी लागू नये आणि कंपनीवर संपूर्ण नियंत्रण मिळवता यावे, या उद्देशाने भानुशालीने परमार यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
२४ जुलै रोजी परमार कंपनीबाहेर पडताच भाडोत्री शूटरने त्यांच्यावर जवळून गोळी झाडली. दुसरी गोळी अडकून पडल्याने आरोपीने पिस्तुलाच्या बटाने त्यांच्या डोक्यावर वार केला आणि साथीदारांसह घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या परमार यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
घटनेनंतर वालीव पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या तपासादरम्यान उत्तर प्रदेशातून भाडोत्री शूटर, शस्त्रपुरवठादार आणि मुख्य सूत्रधारासह एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Ans: कंपनीवर संपूर्ण ताबा मिळवून ₹३२ कोटींचा आर्थिक फायदा मिळवण्यासाठी.
Ans: सागर गिरीश भानुशाली.
Ans: एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.






