• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Crime News Live Updates In Marathi 34

Crime News updates : वैष्णवी हगवणे यांच्या फरार सासऱ्याला अटक

Crime news in Marathi: आज 23 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील, देश आणि विदेशातील गुन्हेगारी संदर्भातील घडामोडी वाचा एका क्लिकवर...

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 23, 2025 | 05:50 PM
Crime news live updates

Crime news live updates

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांचे मृत्यू प्रकरण सध्या चर्चेत आले आहे. वैष्णवी संशयास्पद मृत्यू प्रकरणात फरार असलेले राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना आज पहाटे अटक झाली आहे. स्वारगेट परिसरात त्यांना अटक करण्यात आली आहे.

The liveblog has ended.
  • 23 May 2025 05:08 PM (IST)

    23 May 2025 05:08 PM (IST)

    पती बिकिनी घालतो आणि इतर पुरुषांसोबत…’, पत्नी पोलिसांकडे गेली

    उत्तर प्रदेशातील जिल्हा कारागृह परिसरातील सरकारी निवासस्थानात राहणाऱ्या डॉ. वरुणेश दुबे यांच्या पत्नी सिम्पी पांडे यांनी आरोप केला आहे की, तिचा पती एका ट्रान्सजेंडर महिलेचे रुप घेऊन अश्लील व्हिडीओ तयार करायचा आणि पैशासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकायचा. सिम्पीने सांगितले की, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तिने तिच्या पतीला एका पुरूषासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. घराची सजावट, अंगठी आणि पार्श्वभूमी पाहून तिला लगेच कळले की ते तिच्याच घरात चित्रित केले आहे.

  • 23 May 2025 04:43 PM (IST)

    23 May 2025 04:43 PM (IST)

    नामांकित बिल्डरला लाखो रुपयांना घातला गंडा

    जंगली महाराज रस्त्यावरील एका नामांकित बिल्डरला ४६ लाखांहून अधिक रक्कम जबरदस्तीने ट्रान्सफर करायला लावून त्यास अश्लील भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अनिल दिलीप अरगडे (वय ३७, रा. महावीर नगर, माणिकबाग) यांनी शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून आरोपी धीरज दिनेशचंद्र उर्फ बाळासाहेब अरगडे (वय ३९, रा. मुळा रोड, खडकी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ एप्रिल २०२४ ते दोन मे २०२५ या कालावधीत फोनवर व प्रत्यक्ष भेटीत घडली आहे.

  • 23 May 2025 04:08 PM (IST)

    23 May 2025 04:08 PM (IST)

    पुण्यात चोरीच्या घटना वाढल्या

    कोथरुडमधून एक बातमी समोर आली आहे. कोथरुडमधील पेठकर साम्राज्य सोसायटी रस्त्यावर सायंकळच्या वेळेस चोरट्यांनी वृद्ध महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याघटनेमुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना २२ मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास स्वरांजली बिल्डिंगच्या गेटसमोर घडली. याप्रकरणी पेठकर साम्राज्य सोसायटीत राहणाऱ्या ७४ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून कोथरुड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 23 May 2025 03:54 PM (IST)

    23 May 2025 03:54 PM (IST)

    प्रवाशांच्या दागिन्यावर डल्ला मारणाऱ्या महिलेला ठोकल्या बेड्या

    स्वारगेट एस बसस्थानकातील गर्दी तसेच प्रवाशांचे दुलर्क्ष चोरट्यांच्या पत्यावर पडत असून, पुन्हा एकदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील दागिने चोरीच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला अटक केली आहे. गर्दीचा फायदा घेऊन चोर प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारत आहेत. भाग्यश्री जितेश कसबे (वय ४०, रा. कळसगाव गावठाण, विश्रांतवाडी, मुळ रा. विकासनगर, लातूर) असे या महिलेचे नाव आहे. तिच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत़. ३ गुन्ह्यातील २ लाख ७० हजार रुपयांचे ३० ग्रॅम दागिने जप्त करण्यात आले आहेत. चोरीचे दागिणे विक्री करण्यासाठी आली असताना, पोलिसांनी तिला पकडले. ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटीलनयांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, पोलीस हवालदार हर्षल शिंदे, प्रशांत टोणपे, हनुमंत दुधे यांनी केली आहे.

  • 23 May 2025 03:41 PM (IST)

    23 May 2025 03:41 PM (IST)

    वाहतूक विभागातील ‘डिओं’ना दणका

    सातत्याने चर्चेत असणारा पण, काही महिन्यांपासून समाधानकारक कामगिरी करणाऱ्या वाहतूक विभागातील डिओंचा मनमानी कारभार चव्हाट्यांवर आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी डिओंना दणका देत एकाचवेळी तीसही विभागातील या ड्युटी ऑफिसर (डिओ) असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्याचे आदेश दिले. त्यानूसार एकाचवेळी ३० कर्मचाऱ्यांची लष्कर व बंडगार्डन पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. ही बदली तात्पुरती आहे. वाहतूक शाखेचा अतिरीक्त कार्यभार सांभळणारे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी रात्री याबाबतचे आदेश दिले. यानंतर मात्र, पोलीस दलात खळबळ उडाली. दुसरीकडे डिओच्या माध्यमातून मनमानी करणाऱ्यांना देखील चाप बसला आहे.

  • 23 May 2025 02:47 PM (IST)

    23 May 2025 02:47 PM (IST)

    सुसाईड नोट लिहित 13 वर्षीय मुलानं संपवलं जीवन

    पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूरमध्ये एका १३ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली. एवढेच नाही तर त्याने एक सुसाईड नोटही लिहिली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरातील लोकांना धक्का बसला आहे. सातवीच्या वर्गात शिकणारा कृष्णेंदु दास याने सुसाईड नोटमध्ये त्याच्या आईसाठी एक संदेश लिहिला आहे, ज्यामध्ये तो म्हणतो, 'आई, मी चोरी केलेली नाही.

  • 23 May 2025 02:42 PM (IST)

    23 May 2025 02:42 PM (IST)

    बीडमध्ये पवनचक्कीवरून राडा; सुरक्षारक्षकाच्या गोळीबारात एकाचा मृत्यू

    बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या पवनचक्की वादाला पुन्हा एकदा हिंसक वळण लागले आहे. लिंबागणेश परिसरातील पवनचक्की प्रकल्पात सुरक्षारक्षकाने चोरट्यांवर गोळीबार केल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे.

  • 23 May 2025 01:27 PM (IST)

    23 May 2025 01:27 PM (IST)

    कोथरुडमधील एकाची साडेनऊ लाखांची फसवणूक

    डहाणूकर कॉलनी येथे राहणाऱ्या ६९ वर्षीय व्यक्तीला मोबाईलवर खास क्रेडिट कार्ड योजनेची जाहिरात दिसली. तक्रारदाराने ती जाहिरात उघडली. त्यातील फॉर्ममध्ये आवश्यक सर्व माहिती नमूद केली. नंतर तक्रारदाराला ‘बँक ऑफ इंडिया’च्या नावाने संपर्क करण्यात आला. समोरील व्यक्तीने तक्रारदाराला ‘तुमचे क्रेडिट कार्ड मंजूर झाले आहे. पुढील प्रक्रियेसाठी वैयक्तिक माहिती द्यावी लागेल,’असे सांगितले. नंतर सायबर चोरट्यांनी तक्रारदाराकडून सर्व वैयक्तिक माहिती घेतली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तक्रारदार यांच्या पत्नीच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर व्हिडिओ कॉल केला. अॅडमिनिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन आवश्यक असल्याचे सांगून एपीके फाइल पाठवली. त्यांना त्यावर क्लिक करण्यास सांगितले. त्याद्वारे सायबर चोरट्यांनी त्यांच्या फोनचा ताबा घेऊन त्यांच्या खात्यातील सुमारे साडेनऊ लाख रुपये काढून घेतले.

  • 23 May 2025 01:27 PM (IST)

    23 May 2025 01:27 PM (IST)

    शेअर बाजारात गुंतवणूकीच्या आमिषाने फसवणूक

    ‘शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास ३० ते ३५ टक्के परतावा मिळेल,’ असे आमिष दाखवून अनेकांची १ कोटी २१ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी धायरीतील ३४ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. त्यावरून नांदेडसिटी पोलिसांत गुजरातमधील प्रियांक दवे, अभयकुमार दवे, मित दवे, सुमित बोराणा, झील जैन, अयुष सेवक, जय पटेल, पंकज जैन, पिंटू जानी आणि निकुंज जानी (रा. लुणावडा व गोध्रा, गुजरात) अशा नावाच्या व्यक्तींवर गुन्हा नोदंवला आहे.

  • 23 May 2025 12:03 PM (IST)

    23 May 2025 12:03 PM (IST)

    गुटख्याची तस्करी करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

    गुटखा माफियांनी आता लपून छापून खरेदी-विक्री सुरू केल्याचे दिसत असून, कपड्याच्या आडून ट्रान्सपोर्टद्वारे प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सिगारेटची वाहतूक करणार्‍या रॅकेटचा गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी टेम्पो चालक, त्याचा मालक, ट्रान्सपोर्ट मालक, गोडाऊन मॅनेजर यांना पकडले आहे. गुटख्यासह टेम्पो, कंटेनर असा तब्बल एक कोटी 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केल आहे. ऊरुळी देवाची येथील मंतरवाडी फाट्यावर ही कारवाई केली.

  • 23 May 2025 11:45 AM (IST)

    23 May 2025 11:45 AM (IST)

    हिंगोली जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

    हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर गावामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतमजुरीचे पैसे मागितल्याचा कारणावरून मजुराला तीन ते चार जणांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ६०० रुपये शेतमजुरीचे मागितले म्हणून लाठ्याकाठ्या आणि लोखंडी रॉडसह लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे.

Web Title: Crime news live updates in marathi 34

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 11:43 AM

Topics:  

  • Arrested News
  • Cmomaharasahtra
  • crime news
  • Pune Crime
  • Rajendra Hagawane
  • Vaishnavi hagawane

संबंधित बातम्या

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…
1

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
2

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Crime: मौजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी केली चोरी, दुचाकीसह दोन रिक्षा जप्त
3

Pune Crime: मौजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी केली चोरी, दुचाकीसह दोन रिक्षा जप्त

Cyber Crime : सायबर चोरट्यांचा आला व्हॉट्सॲप कॉल, महिलेला धमकी दिली अन्…
4

Cyber Crime : सायबर चोरट्यांचा आला व्हॉट्सॲप कॉल, महिलेला धमकी दिली अन्…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शेतात दिसून आलं थरकाप उडवणारं दृश्य, जिकडे तिकडे फक्त सापांचा सडा…. पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही; Video Viral

शेतात दिसून आलं थरकाप उडवणारं दृश्य, जिकडे तिकडे फक्त सापांचा सडा…. पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही; Video Viral

Vats Dwadashi: वत्स द्वादशी कधी आहे? जाणून घ्या या व्रताचे पूजा पद्धत आणि महत्त्व

Vats Dwadashi: वत्स द्वादशी कधी आहे? जाणून घ्या या व्रताचे पूजा पद्धत आणि महत्त्व

Asia Cup Hockey 2025 :पाकिस्तान अधिकृतपणे बाहेर; ओमानचीही स्पर्धेतून माघार, ‘या’ दोन संघांची झाली एंट्री..

Asia Cup Hockey 2025 :पाकिस्तान अधिकृतपणे बाहेर; ओमानचीही स्पर्धेतून माघार, ‘या’ दोन संघांची झाली एंट्री..

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या ‘या’ पदार्थांचे नियमित करा सेवन, वाढत्या वयात सुद्धा दिसाल सुंदर

दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या ‘या’ पदार्थांचे नियमित करा सेवन, वाढत्या वयात सुद्धा दिसाल सुंदर

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

Zodiac Sign: गजकेसरी योगामुळे वृषभ राशीसह या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

Zodiac Sign: गजकेसरी योगामुळे वृषभ राशीसह या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.