नाशिक: डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नाशिकरोड येथील नामांकित ८० वर्षीय डॉक्टर आणि एका महिलेची तब्बल 1 कोटी 46 लाखांची लूट केली आहे. सायबर गुन्हेगारांनी मोबाईल बंद होणार असल्याची धमकी दिली आहे. तसेच व्हिडीओ कॉलवर अटक वॉरंट दाखवत, बँक खात्यातील सर्व रक्कम उकळून घेतली.
Shirdi Crime : शिर्डीत दहीहंडीच्या दिवशी 21 वर्षीय तरुणाची हत्या; दोन तरुणांनी चाकूने सपासप केले वार
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नाशिकमधील एक नामांकित ८० वर्षीय डॉक्टरला अज्ञात महिलेचा कॉल आला. त्यात मोबाईल बंद होणार असल्याची धमकी तिने दिली. त्यानंतर मुंबई सायबर पोलीस ठाण्यात तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, असा दावा करण्यात आला. त्यानंतर कथित क्राईम ब्रांच ऑफिसर प्रदीप सावंत नावाच्या व्यक्तीशी व्हिडीओ कॉलवर बोलणं करून दिलं. ती व्यक्ती पोलीस गणवेशात बसलेली होती. नरेश गोयल मनी लॉंड्रिंग प्रकरणात तुमचा मोबाईल आणि आधार क्रमांक सापडला आहे, असं सांगत अटक वॉरंट दाखविले.चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणालाही सांगू नका, अशी सक्त ताकीदही दिली. आणि बोलता बोलता विविध खात्यांमधून कोट्यवधी रुपयांना गंडा घातलाय. अशी माहिती सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी दिलीय.
पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या
कात्रजमधील आंबेगाव परिसरातून बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि काडतूस जप्त केले आहे.शुभम राजेंद्र बेलदरे (वय २९, रा. दत्तनगर, जांभुळवाडी रस्ता, आंबेगाव), मयूर ज्ञानोबा मोहोळ (वय २३, रा. नऱ्हे रस्ता, धायरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी मयूर भोकरे आणि रहीम शेख हे कात्रज भागात गस्त घालत होते. त्या वेळी दोघे जण थांबले असून, त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती भोकरे आणि शेख यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त केले. दोघांनी पिस्तूल का बाळगले, तसेच त्यांनी कोणाकडून आणले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, सहायक निरीक्षक राजेश माळगावे, उपनिरीक्षक रामेश्वर पारवे, रणजीत फडतरे, रहीम शेख, मयूर भोकरे, विजय कांबळे, नितीन बोराटे, नितीन कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार यांनी ही कामगिरी केली.
Rajasthan News : भाजप नेत्याने प्रेयसीसाठी केली पत्नीची हत्या; नंतर मृतदेहाजवळ बसून रडला…