१ कॅब अन् 3 महिला, आधी कपडे काढले मग स्पर्श केला (फोटो सौजन्य-X)
कुठेतरी जायचं म्हटलं तर कॅब बुक करण्याचा विचार करतो. आजच्या धावपळीच्या जीवनात बहुतेक जणांना कॅब सोयीस्कर पडते. काहींना सुरक्षित वाटते म्हणून… पण ते खरोखर सुरक्षित आहे का? अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही असे वाटत असेल की प्रत्येक वेळी असा प्रवास करणे सुरक्षित आहे, तर येथे थांबा… कारण प्रत्येक वेळी ते सुरक्षित असेलच असे नाही, याचे उदाहरण म्हणजे कोलकात्यातील एका तरुणीने घाईघाईत कॅब बुक केली पण पुढे जे घडले ते भयानक होते. काय आहे संपूर्ण प्रकरण?
ही घटना कोलकातामधील बेहला येथील पर्णश्री परिसरात घडली आहे. जिथे १७ मे रोजी रात्री एक तरुणी तिच्या रुममेट आणि तिच्या आईसोबत मॉलमध्ये गेली होती. रात्री ९:३० च्या सुमारास जेव्हा ते अवनी मॉलमधून परतणार होते, तेव्हा मुलीने कॅब बुक केली. कॅबही वेळेवर आली आणि मुलगी तिच्या रुममेट आणि तिच्या आईसोबत कॅबमध्ये बसली. पण ते अर्ध्या रस्त्यात पोहोचताच कॅब ड्रायव्हरचे भाव पूर्णपणे बदलले. कॅब ड्रायव्हर रिझवान कुरेशीने अश्लील कृत्ये करायला सुरुवात केली.
मुलगी कॅबच्या पुढच्या सीटवर बसली होती, तर तिची मैत्रीण आणि तिची आई मागच्या सीटवर होते. यावेळी, कॅब ड्रायव्हरने स्वत:चे कपडे काढले आणि नंतर बाजुला बसलेल्या महिलेल्या अयोग्यरित्या स्पर्श करण्यास सुरुवात केली. ड्रायव्हरच्या या कृतीनंतर तरुणीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला , पण पण त्याने त्याचे कृत्य थांबवले नाही. या 3 महिलांनी बाहेरच्या बाजूला पोलिसांचा शोध घेत होते. पण डीएच रोडवर कोणीही दिसला नाही. या तिन्ही महिला घराजवळ पोहचताच जवळच्या पोलिस ठाण्यात कॅब ड्रायव्हरच्या विरोधात गुन्हा नोंदवला. त्यानंतर पर्णश्री पोलिस ठाण्यात कॅब घेऊन गेला आणि पोलिसांना सर्व प्रकार सांगितला आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी चालक रिझवान कुरेशीला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, चालकाकडे आवश्यक कागदपत्रे नव्हती. त्याच वेळी, अॅप कॅब कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांच्याकडे अशा वर्तनासाठी कोणतेही स्थान नाही. त्यांनी ड्रायव्हरला प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले आहे आणि त्याचा परवानाही रद्द केला आहे.