पत्नीसोबत अनैतिक संबध ठेवणाऱ्याची पश्चिम बंगालमध्ये हत्या, मानपाडा पोलिसांनी केली अटक (फोटो सौजन्य-X)
डोंबिवली : पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्या मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. हंजला खान असे या आरोपीचे नाव आहे. तो कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी परिसरात राहणारा आहे. हंजला याच्या विरोधात यापूर्वी सहा मोबाईल चोरी आणि एक हत्येचा गुन्हा दाखल आहे.
डोंबिवली पूर्वेतील मिलापनगर परिसरात काही दिवसापूर्वी ओमकार पवार नावाचा तरुण त्याच्या मित्रासोबत पायी चालत जात असताना स्कूटीवरुन हेल्मेट घातलेला तरुण त्याच्या बाजूला आला. त्यावेळी ओमकार पवार कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होता. याचवेळी चोरट्याने त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. ओमकार आणि त्याच्या मित्राने चोरट्याचा पाठलाग केला. तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.
मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी महेश राळेभात आणि संपत फडोल यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिस चोरट्याच्या घरी पोहचले. हंजला खान असे या चोरट्याचे नाव आहे. तो कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडीत राहणारा आहे. त्याच्या विरोधात यापूर्वी मोबाईल चोरीचे सहा गुन्हे आणि एक हत्येचा गुन्हा आहे. त्याने दोन वर्षापूर्वी एका ट्रक चालकाची हत्या केली होती. हंजला खानच्या पोलिस चौकशीत आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.