नोकरीच्या अमिषाने ४० लाखांची फसवणूक (फोटो- istockphoto)
जत: महसूल मंत्र्याच्या कार्यालयात मी नोकरीला असून मी तुम्हाला मंत्रालयात क्लार्क या पदावर शासकीय नोकरी लावून देतो, अशी बतावणी करून तब्बल ४० लाख रुपयेची फसवणूक (Crime News) केल्याप्रकरणी रणजित तुकाराम कुंभार (वय ४० रा. भोसे, ता. पंढरपूर) याच्याविरोधात जत पोलीस (Jat) ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संबंधित खिलारे कुटुंबीयांच्या वतीने दिलेल्या फिर्यादीवरून कुंभार यांच्या विरोधात फसवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून आमिष दाखवून फसवणूक, विश्वासघात करणे, बनावट कागदपत्रांची निर्मिती या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची फसवणूक ऑगस्ट २०२३ ते ऑगस्ट २०२५ या दोन वर्षाच्या कालावधीत झाली आहे. या फसवणुकीच्या प्रकरणांनी जत तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून अनेक युवकांनी जत पोलीस ठाण्याकडे धाव घेतली आहे, अजून ६ जणांचे पैसे घेतलेची प्राथमिक माहिती मिळत आहे.
बनावट निवड आदेश पाठवून केली दिशाभूल
डिसेंबर २०२४ रोजी आरोपी रणजीत कुंभार याने खिलारे यांना जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या नावाने बनावट निवडसूची व्हॉट्सअॅपवर पाठवली. यात खिलारे यांच्यातील दोघांची निवड झाल्याचे दाखवण्यात आले होते. हे आदेश ३० एप्रिल २०१५ रोजी मिळतील असे सांगण्यात आले. मात्र तसे न झाल्याने खिलारे यांनी वारंवार संपर्क साधला असता आरोपीने टाळाटाळ केलीः या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातूरे करत आहेत.
20 हजाराची लाच घेणं भोवलं; पंढरपुरात मंडळ अधिकाऱ्याला रंगेहात पकडले






