Photo Credit- Social Media
नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा बुरडी हत्याकांडासारख्या घटनेने हादरून गेली आहे. दिल्लीतील वसंत कुंज येथील रंगपुरी गावात एकाच कुटुंबातील5 जणांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या शुक्रवारी सकाळी 10.18 वाजता शेजाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी येथील फ्लॅटचे कुलूप तोडून मृतदेह बाहेर काढला. एका व्यक्तीसह त्याच्या चार मुलींनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील वसंत कुंज येथील रंगपुरी एका इमारतीतील फ्लॅटमद्ये 50 वर्षीय हिरालाल त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या चार मुली असे कुटुंब राहत होते. 50 वर्षीय हीरा लाल रंगपुरी भागात भाड्याच्या घरात आपल्या कुटुंबासह राहत असल्याची माहिती आहे. त्यांना चार मुलीही होत्या, चारही मुली अपंग होत्या. अपंग असल्यामुळे या मुलींना कुठेही जाता येत नव्हते. हीरालाल यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलींच्या संगोपनाची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आली होती.
हेही वाचा: इतके वर्षे शिवसेना मागे का राहिली….? आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले
शुक्रवारी (27 सप्टेंबर) हिरालाल यांच्या फ्लॅटमधून अचानक दुर्गंधी येऊ लागली. यावर रस्त्याच्या पलीकडे असलेल्या घरातील एका व्यक्तीने पोलिसांना फोन करून दुर्गंधी येत असल्याची माहिती दिली. वसंत कुंज दक्षिण पोलिस जेव्हा बातमी मिळाल्यावर फ्लॅटवर पोहोचले तेव्हा आसपासच्या लोकांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांनी हीरालाल त्याच्या कुटुंबाला बरेच दिवस पाहिले नसल्याचे सांगितले. त्यांतर घरमालक आणि इतर लोकांच्या उपस्थितीत पोलिसांनी दरवाजा तोडला तेव्हा आतून भयानक वास येऊ लागला.
पोलिसांनी खोलीत प्रवेश केला तेव्हा पहिल्या खोलीत बेडवर हिरालालचा मृतदेह पडलेला होता. दुसऱ्या खोलीत बेडवर 18 वर्षांची नीतू, 15 वर्षांची निशी, 10 वर्षांची नीरू आणि 8 वर्षांची मुलगी निधी या चार मुलींचे मृतदेह पडले होते. घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट सापडली नसून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. शवविच्छेदन अहवालात त्या सर्वांनी सल्फा हे प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
दरम्यान या घटनेने पुन्हा एकदा बुराडी आत्महत्या प्रकरणाची आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. जेव्हा 1 जुलै 2018 रोजी बुराडी येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. येथे एकाच कुटुंबातील 11 जणांनी एकत्र आत्महत्या केली होती.
हेही वाचा: सैफ अली खानने मुलगा इब्राहिम आणि पलक तिवारीच्या नात्याचा केला खुलासा