छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरात पोलिसांनी धाड टाकली. धाड टाकताच पोलिसांना ड्रग्ज नाही तर चक्क जादूटोणा करण्यासाठी वापरली जाणारी साहित्य आढळली. या घटनेने खळबळ उडाली आहे. या छाप्यात पोलिसांना एक गावठी कट्टा देखील मिळाला आहे.
Akola Crime : अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय विसर्जनाला गेले आणि भयंकर घडलं; अकोल्यातील धक्कादायक घटना
नियाज नजीर शेख असे एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरचे नाव आहे. कटकट गेट भागातील मुजीब कॉलनी भागात तो राहत होता. विशेष म्हणजे आरोपी नियाज हा 2018 मध्ये झालेल्या राजाबाजार दंगलीतील आरोपी आहे. तो सध्या जामिनावर बाहेर आहे.
काय सापडला त्याच्या घरात?
आरोपीच्या घरात जनावरांची दोन हाडे, कासवाचे वरचे अवरण असलेले हाड, काळ्या रंगाचे कापडी भुताचे मास्क, चामडी हंटर, रसायनाच्या बाटल्या, कवड्याच्या माळा, रिल्व्हर रंगाच्या धातूचे 84 नाणे, गोल्ड रंगाचे 79 जाणे, दोन इंजेक्शन सिरींज, महादेवाची पिंड असलेले अगरबत्ती स्टँड, काचेच्या 10 रिकाम्या बाटल्या, 9 काळ्या रंगाचे दगडगोटे, काही इलेक्ट्रिक वजन काटे आदी साहित्य मिळून आले आहे.
प्रेमसंबंध उघड होण्याच्या भीतीने प्रशिक्षणार्थीचे अपहरण; अकॅडमी संचालकासह चौघांना अटक
छत्रपती संभाजीनगरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. संभाजीनगरमधील एका अकॅडमीच्या संचालकाने आपल्याच प्रशिक्षणार्थी विध्यार्थी अमोल डक याच अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेमप्रकरणामुळे अकॅडमीच्या संचालकाने आपल्या प्रशिक्षणार्थीचं अपहरण केलं आहे. या प्रकरणात आरोपी संचालकाला अटक करण्यात आली असून संचालकांसह आणखी तीन जणांचा समावेश आहे. न्यायालयाने चौघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरमधील हिंदवी करिअर अकॅडमीचा संचालक दशरथ जाधव याचं अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या एका मुलीवर प्रेम जडलं होतं. यामुळे त्याने विध्यार्थी अमोल डख याची मदत घेतली होती. मात्र आपला चुकीच्या पद्धतीने वापर केल्याचे अमोलच्या लक्षात येताच संचालक आणि त्याच्यामध्ये वाद झाला. यानंतर दशरथ यांनी अमोलला अकॅडमीमधून काढून टाकलं.
मात्र अमोलकडे दशरथच्या प्रेमसंबंधाचे काही व्हॉइस रेकॉर्डिंग आणि पुरावे होते. तो आपलं बिंग फोडेल ही त्याला भीती त्याने होती. या भीतीने दशरथने अमोलचं अपहरण करण्याचं ठरवलं.अपहरण करण्यासाठी दशरथने दोन मुलांची मदत घेतली आहे. त्याने आधी अमोलला केळगाव घाटात बोलावलं. अमोल तिथे येताच त्याला मारहाण करून त्याच्याकडून सर्व पुरावे घेतले. नंतर त्याला कारमध्ये टाकून त्याच अपहरण केलं. त्याला सिल्लोडला घेऊन जाण्याचा प्लॅन होता. मात्र त्याच दरम्यान एका ओळखीच्या व्यक्तीने अमोलला दशरथसोबत गाडीत पाहिलं. त्याने हा सर्व प्रकार अमोलच्या घरी सांगितला. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत अमोलची सुटका केली आहे.
विसर्जन मिरवणुकीत वाद; शिरोलीत दोघांवर सत्तूरने सपासप वार