नववधूने सत्यनारायण पूजा होताच ठोकली धूम, गुन्हा दाखल (फोटो सौजन्य-X)
मुंबई: आपल्या भावी जोडीदाराला शोधण्यासाठी मॅट्रिमोनियल साइट्सची मदत घेत असल्यास मुलींनी वेळीच सावध होण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. खोट्या माहितीच्या आधारे भावनिक आणि शारीरिक संबंध ठेवून मुलाकडून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. अशी माहिती स्विफ्ट डिटेक्टिव्ह अँड इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या संचालिका प्रिया काकडे यांनी दिली. कोरोनानंतर या घटनांमध्ये वाढ झाल्याने मुलींनी ऑनलाईन साइट्सच्या मदतीने जोडीदार शोधताना अलार्म कॉल ओळखा, मुलाची संपूर्ण माहिती घेण्यासाठी गुप्तहेरांची मदत घ्या, असे आवाहन स्विफ्ट डिटेक्टिव्ह एण्ड इन्व्हेस्टिकेशन एजन्सी या प्रसिद्ध खासगी गुप्तहेर संस्थेच्या संचालिका प्रिया काकडे यांनी केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ऑनलाईन गुन्हेगारीतून मुलींच्या होणा-या फसवणूकीबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत प्रिया काकडे यांनी सर्वांसमोर सद्यस्थितीत ऑनलाईन फसवणूकीतील भयावह सत्य सांगितले. ‘‘मी गेली २० वर्ष या गुप्तहेर क्षेत्रात कार्यरत आहे. आम्ही घटस्फोट, विवाहबाह्य संबंध, खासगी तपास, आर्थिक फसवणूकीची प्रकरणे हाताळतो. आतापर्यंत तब्बल १ हजार ६० केसेसमध्ये पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या संस्थेने मदत केली आहे. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत कोरोनानंतरच्या केसेस हाताळताना एक विशिष्ट पॅटर्न मला प्रकर्षाने जाणवले. कोरोनानंतर घरगुती हिंसाचारात वाढ होत असल्याने अनेकांचे घटस्फोट झाले. तीन-चार वर्षांचा काळ सरल्यानंतर आता महिला लग्नाचा पुनर्विचार करु लागल्या आहेत. या महिलांना मेट्रीमॉनियल साइट्सवरुन ओळख होणा-या जोडीदाराकडून आर्थिक फसवणूक होत आहे.’’
स्विफ्ट डिटेक्टिव्ह एण्ड इन्व्हेस्टिकेशन एजन्सीच्या पाहणीत तिशी ओलांडलेल्या घटस्फोटित महिला, सर्वसामान्य दिसणा-या महिला, स्थूल महिला या केसेसच्या बळी ठरल्या आहेत. वयाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतरही लग्न होत नसल्याने संबंधित महिलेच्या कुटुंबावर समाजाकडून प्रश्नांचा भडिमार सुरु असतो. सौंदर्याच्या सामान्य निकषांपासून दूर असणा-या मुली अशा मेट्रिमॉनियल साइट्सवरुन ओळख झालेल्या मुलांच्या भूलथापांना फसतात. लग्न जुळल्यानंतर कोरोनात घटस्फोट झाला असेल तर कुटुंबाकडून लग्नाची घाई सुरु असते. या महिला, कुटुंबीय मुलांबाबत फारशी चौकशी करत नाही. या मुलींची लग्नानंतर हमखास फसवणूक होते. नवरा घटस्फोट देतानाही पैशांची मागणी करतो. बरेचदा मुलीला या जाचातून सुटका हवी असते. मात्र घटस्फोटासाठी सबळ पुरावे नसतात. अशा केसेसध्ये स्विफ्ट डिटेक्टिव्ह एण्ड इन्व्हेस्टिकेशन एजन्सीने पीडीत महिलांना पुरावे शोधून देण्यासाठी मदत केली आहे.
एका केसबाबत उदाहरण देताना प्रिया काकडे म्हणाल्या की, ‘‘संबंधित पीडीतेने मेट्रॉमॉनियल साइट्सवरुन आपले लग्न जुळवले होते. घरातील परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबीयांनी लग्नाला होकार दिला. लग्नांतर त्यांना मुलगी झाली. कालांतराने पीडीतेला आपला नवरा गे असल्याचे समजले. मला मुलीच्या वडिलांनी संपर्क केला. अशा केसेसची पोलिसांकडून चौकशी होत नाही, याबद्दल त्यांना कल्पना आली होती. पीडीतेला नव-यापासून घटस्फोट हवा होता. आम्ही न्यायालयासमोर सबळ पुरावे सादर केले. तिला पोटगी मिळाली आणि मुलीचा ताबाही मिळाला.’’
• गरिबी, बरेचदा मुलीची कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली नसते. अशा मुलींना परिचयातून मिळणाऱ्या स्थळातून सतत नकार दिला जातो.
• घटस्फोट, पहिल्या लग्नापासून मूल असणे, वाढते वय या कारणांमुळेही मुली बरेचदा मॅट्रिमोनियल साइट्सवरील मुलांची संपूर्ण चौकशी करत नाहीत.
• मॅट्रिमोनियल साइट्सवरून ओळख झालेल्या मुलाशी भावनिक, मानसिक आणि शारीरिक नातं निर्माण करू नका.
• मुलाची माहिती घेण्यापूर्वी कोणतेही संबंध येऊ नयेत.
• तुमची पडती बाजू असेल तर मुलगा लग्नाला पटकन तयार का झाला इथेच संशयाला वाव मिळतो.
• मुलाची जमेची बाजू असतानाही आपल्याला तत्काळ होकार का मिळाला, ही शंका ‘अलार्म कॉल’ असते.
• मुलाचे प्रोफाइल तपासा.
• आर्थिक व्यवहार टाळा.
• मुलाचा व्यवसाय, गुंतवणूक याबद्दल खात्रीलायक माहिती घ्या.
• मुलाच्या शेजाऱ्यांपासून ते नोकरी करणाऱ्या कंपनीत कसून चौकशी करावी.