CRIME (फोटो सौजन्य- PINTEREST)
मुंबईच्या वरळी सी-फेसवर एक धक्कादायक घटना घडली आहे. हातातील छत्री अंगाला लागली याने संतापून एका ३५ वर्षीय व्यक्तीने महिलेच्या पाठीत काचेचा तुकडा खुपसल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १९ एप्रिलला घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमी महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर घडलेल्या प्रकारची माहिती पोलिसांना देण्यात आली.
दीड वर्षाच्या चिमुरडीला मिळाला दहा महिन्यानंतर न्याय, डॉक्टरांवर गुन्हा दाखल, नेमकं काय प्रकरण?
हातातली छत्री लागल्याने एका ३५ वर्षीय व्यक्तीने संतापून एका महिलेच्या पाठीत काचेचा तुकडा खुपसला. जखमी महिलेला तात्काळ परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. हि घटना शनिवारी (१९ एप्रिल)ला वरळी सी फेस परिसरात घडली. या प्रकारची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी शोध मोहीम राबवून पाच तासात आरोपीला अटक केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास महिला अनिता बाळू पाटकर या वरळी सीफेस परिसरातील जे के कपूर चौक या ठिकाणाहून जात होत्या. त्यावेळी त्यांच्या हातातील छत्री तेथील एका व्यक्तीला लागली. त्याला संतापून त्याव्यक्तीने हातात असणाऱ्या काचेचा तुकडा महिलेच्या पाठीत खुपसला. याप्रकरणी महिलेच्या मुलाने वरळी पोलिसांकडे तक्रार केली. दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि आरोपीचा शोध सुरु केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासली
या गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषंगाने परिसरातील सीसीटीव्ही तपासणी केली असता आरोपी प्रेमनगर येथे असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तेथे छापा टाकून आरोपी सचिन भगवान अवसरमोल(35) याला अटक केली. सचिन हा छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा येथील रहिवासी आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास वरळी पोलीस करत आहेत. मात्र क्षुल्लक कारणातून एका व्यक्तीने महिलेच्या पाठीत चक्क काचेचा तुकडा खुपसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.