पत्नीने अल्पवयीन मुलाच्या मदतीने चक्क पतीला संपविले
मुंबईच्या ॲण्टाॅप हिल परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने संपवल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात इस्माइल अली शेख याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकर सकलाईन गोलम किब्रिया शेख याला अटक केली आहे. तर आरोपी पत्नी सुमय्या ईस्माइल शेख ही फरार आहे.
बीड जिल्ह्यात भीषण अपघात, अपघातात वाचले, पण मृत्यू टळला नाही, सहा जणांचा जागीच मृत्यू,
नेमकं प्रकरण काय?
सकलाईन गोलम किब्रिया शेख आणि सुमय्या ईस्माइल शेख या दोघांचे लग्नाआधी पासून प्रेम संबंध होते. इस्माइल या दोघांचा प्रेमात अडथळा ठरत असे. म्हणून इस्माइलचा काटा काढण्याचा कट दोघांनी रचला. आणि सोमवारी सकलाईन याने चाकूने इस्माइलवर वार करून त्याची हत्या केली आहे. या प्रकरणी ॲण्टाॅप हिल पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकलाईन आणि सुमय्या या दोघांचे लग्नाचा पूर्वीपासून प्रेमसंबंध होते. मात्र सुमय्याच्या कुटुंबाने तिचं लग्न इस्माइल अली शेख याच्यासोबत लावून दिलं. लग्नानंतरही त्यांचे प्रेमसंबंध तसेच होते. पती अडथळा ठरत असल्याने त्यांनी हत्या करण्याचा कट रचला. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे तर सुमय्या फरार आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलं असून फरार आरोपीचा शोध घेत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिस एन्काऊंटर, उद्योजकाच्या घरावर दरोडा टाकणारा ठार
छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसिद्ध उद्योगपती संतोष लड्डा यांच्या घरावर १५ मे रोजी दरोडा पडला होता. या दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी अमोल खोतकर याला पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चकमकीत ठार केले. वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी भागात पोलिसांच्या गुन्हे शाखेला अमोल खोतकरच्या हालचालींबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यासाठी गेले होते. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली.
विजेच्या तीव्र धक्क्याने 3 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू
घरात खेळणाऱ्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या मुलीला कूलरमधून विजेचा जोरदार झटका लागला. त्यातच तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना झमकोली (ता. भिवापूर) येथे शनिवारी (दि.24) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. उन्नती अर्जुन बोटरे (वय ३) असे बालिकेचे नाव असून, या घटनेने संपूर्ण गाव हळहळून गेले आहे.
पुण्यात जबरी चोरीच्या दोन घटना; डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटले