जळगावातून एक घाणेरडा प्रकार समोर आला आहे. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात बोलावून तीन तरुणांना पोलीस उपनिरीक्षकाने पट्ट्याने अमानुषपणे मारहाण करत त्यांचा लैंगिक छळ केल्याचे समोर आले आहे. त्या तरुणांना आधी कपडे काढून नग्न होण्यास सांगितले आणि नंतर एकमेकांसोबत लैंगिक चाळे करायला भाग पाडल्याचा घाणेरडा प्रकार पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस ठाण्यात केल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
नेमकं काय प्रकार?
एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार देण्यात आली होती. या तक्रारदारांच्या आरोपावरून संशयित म्हणून पकडलेल्या भिल्ल समाजाच्या मुलांना पट्ट्याने अमानुषपणे मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर त्यांना अंगावरचे कपडे काढून नग्न व्हायला सांगून एकमेकांसोबत लैंगिक चाळे करायला भाग पाडल्याचा घाणेरडा प्रकार पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस ठाण्यात केल्याचे म्हटले जात आहे. एका महिलेला सुद्धा अश्लील शिवीगाळ करून तिला मारहाण केल्याची तक्रार महिलेने केली आहे. या प्रकरणात बहुजन समाज पार्टीने या प्रकरणात तक्रार केली आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित पोळी उपनिरीक्षकाला निलंबित कारणात आले आहे.
या पोलीस उपनिरीक्षकांचे नाव सज्जनसिंह नार्हेडा आहे. या गंभीर घटनेनंतर संबंधित पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित तरुणांच्या कुटुंबीयांसह भिल्ल समाज संघटनेने निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे केली असल्याचे बहुजन समाज पार्टी, जळगाव जिल्हा महासंघाचे पदाधिकारी सचिन बाविस्कर यांनी म्हटले आहे. संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात येऊन त्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीत दोषी निष्पन्न झाल्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली आहे.
बारामतीमध्ये भीषण अपघात! डंपर खाली दुचाकी आल्याने तीन जणांचा मृत्यू
बारामतीमधील महात्मा फुले चौकात भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. हा अपघात डंपर आणि दुचाकीच्या मधात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वडील आणि त्यांच्या दोन मुली यांच्या मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी डंपरच्या चाकाखाली दुचाकी सापडली आणि तिघेही चेंगरले गेले. ही घटना 27 जुलै रोजी घडली आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नावे वडील ओंकार आचार्य व त्यांच्या दोन मुलींचे नावे चार वर्षाची मधुरा आणि दहा वर्षाची सई आचार्य असे आहे. ओंकार आचार्य हे मूळचे इंदापूर तालुक्यातील सणसर येथील रहिवासी असून सध्या बारामतीतील मोरगाव रोड येथे ते वास्तव्यास होते. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी चालक ओंकार आचार्य यांचं पोटापासून खाली काहीच शिल्लक उरलं नव्हतं. आपल्या मुलीना रस्त्यावर पडलेलं पाहून हळहळलेल्या वडील ओंकार यांनी आपल्या दोन हातांवर जोर देत उठण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या मुलींना तेवढं वाचवा असं म्हणत होते.
विनयभंगाचा बदला घेण्यासाठी हत्येच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा रचला कट; आरोपींना अटक