काय घडलं नेमकं?
आरोपी पत्नीचं नाव रीता कुमारी आणि तिचा प्रियकर अरविंद भारती यांनी पती संजू याचा काटा काढण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी आधी अपहरण केलं त्यानंतर त्याला जंगलात नेऊन त्याची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी मृतकाच्या भावाने म्हणजेच संजयने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संजयने मृतकाचे पत्नी रीता कुमारी आणि तिचा प्रियकर अरविंद भारती यांनी मिळून संजूची हत्या केल्याचे स्पष्ट आरोप केले. त्याने हत्येचा घटनाक्रम सांगितला. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पीडित संजूचा शोध घेण्यास सुरुवात केली.
रविवारी सायंकाळी पोलिसांना संजू भरतीचा मृतदेह जंगलात आढळला. पोलिसांनी संजूची पत्नी रीता कुमारी हिला ताब्यात घेतले. तिची चौकशी केली तेव्हा तिने सुरुवातीला पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. मात्र कठोर चौकशी केली तेव्हा तिने सत्य सांगितले. तिने संजूच्या हत्येचा संपूर्ण कट कसा रचला पोलिसांना सांगितले. या कटात कोण कोण सहभागी होता याचा देखील उलगडा झाला.
पोलिसांनी रिता कुमारीने दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी याघटनेत सामील असलेल्या रिशु कुमार (28) नावाच्या दुसर्या आरोपीला अटक केली. त्याची कठोर चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा काबुल केला. आरोपी अरविंद भारती हा अद्याप फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत आहे. पोलिसांनी संजूचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमार्टमसाठी हजारीबाग सदर रुग्णालयात पाठवला. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून पोलीस अधिक तपस करत आहे.
Ans: पत्नीचा प्रियकरासोबतचा विवाहबाह्य संबंध आणि पती अडथळा ठरत असल्याची भावना.
Ans: पत्नी, तिचा प्रियकर आणि त्यांचे साथीदार. दोघांना अटक झाली असून एक मुख्य आरोपी फरार आहे.
Ans: पतीचे अपहरण करून जंगलात नेले, तिथे त्याची हत्या केली आणि मृतदेह फेकून दिला.






