लायटरसाठी बाजूला व्हायला सांगितले म्हणून तरुणाला बेदम मारहाण, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Kalyan Crime News : लायटर घेण्यासाठी दोन तरुणांना बाजूला व्हा, असे सांगितले म्हणून दोघांनी मिळून कृष्णा मिश्रा नावाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना कल्याण पूर्वेतील मलंग रोड परिसरात घडली आहे. या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पुढची प्रक्रिया सुरु केली आहे.
कल्याण पूर्वेतील मलंगरोड परिसरात श्री कृपा हाउसिंग सोसायटी आहे. या सोसायटीत राहणारे कृष्णा मिश्रा यांच्या घरी काही नातेवाईक आले होते. त्यांना भेटण्याकरीता ते बिल्डींग खाली आले. रस्त्यावर आलेल्या एका टपरीवर ते गेले. सिगारेट पिण्यासाठी त्यांना लायटर हवा होता. पान टपरीवर लावलेला लायटर घेण्यासठी ते पुढे सरसावले. टपरी समोर दोन तरुण उभे होते. क्रीष्णा त्यांनी बाजूला होण्यासाठी सांगितले.त्यावरुन कृष्णा यांचा अजय नावाच्या तरुणासोबत वाद झाला. या वादातून अजय आणि त्याच्या मित्राने मिळून क्रीष्णावर हल्ला केला. या हल्ल्यात क्रीष्णा गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णलायात उपचार सुरु आहे. या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे. या परिसरात गुन्हेगारी वाढली आहे. या पूर्वी या परिसरात दोन हत्या झालेल्या आहेत. किरकोळ वाद दररोज होता. या वादाचा फटाक महिलांना जास्त बसतो. रस्त्यावर चालायचे कसे अशी समस्या उद्भवते. या परिसरात दारुड्यांची गर्दूल्ल्यांची दहशत आहे. पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.
दरम्यान याआधी कल्याण-कसारा रेल्वेमार्गावर असलेल्या आंबिवली स्टेशनजवळच्या वडवली गावातील एका मोबाईल व्यावसायिकाने कल्याण पश्चिमेतील बैलबाजार (भोईवाडा) भागातील एका खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. या व्याजाने घेतलेल्या पैशांचे नियमित हप्ते मोबाईल व्यावसायिकाने फेडले नाहीत म्हणून खासगी सावकाराच्या चार हस्तकांनी मिळून व्यावसायिकाला हॉकी स्टिक, कमरेचा पट्टा आणि वायरच्या साह्याने बेदम मारहाण केली. या प्रकरणी मोबाईल व्यावसायिकाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. घटना घडलेले ठिकाण खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने बाजरपेठ पोलिसांनी हा गुन्हा खडकपाडा पोलिसांकडे ठाण्यात वर्ग केला आहे.