दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या सुमारास लांबच्या पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पर्स आणि इतर मौल्यवान सामान चोरीला जाण्याच्या घटना कल्याण रेल्वे स्थानक परिसरात घडत होत्या. या सगळ्या प्रकरणाचा सुगावा लागताच कल्याण रेल्वे गुन्हेने याचा सखोल तपास करत सराईत चोरट्यांना ताब्यात घेतलं आहे.कल्याण रेल्वे गुन्हे शाखा पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत मेल एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवाशांच्या पर्स चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.सहीमत अंजूर शेख असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी सहा गुन्ह्याची उघड करत या आरोपीकडून पोलिसांनी 4,56,430 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, आयपॅड आणि घड्याळे जप्त केले आहे.
मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये झोपलेल्या महिला प्रवाशांच्या पर्स , महागड्या वस्तू ,सोन्याचे दागिन चोरी करण्याच्या अनेक घटना घडत होत्या. असाच प्रकार, दिनांक 22 तारखेला मंगलोर रेल्वे स्टेशनवरून निघालेल्या निझामुद्दीन एक्सप्रेसमध्ये झाला. या एक्सप्रेसमधील एका महिलेची पर्स चोरी झाल्याची तक्रार डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल झाली. याचा तपास करण्यासाठी पोलिसांची विशेष टीम तयार करत साध्या गणवेशात स्टेशन परिसरात तैनात केले याच दरम्यान पोलिसांना गुप्त माहितीच्या आधार बदलापूर शहर हद्दीतून आरोपी सहीमत अंजूर शेख (वय 29, रा. रबाळे, नवी मुंबई) याला अटक करत त्याच्या कडे चौकशी केली असता त्याने सहा गुन्ह्यांची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याच्याकडून 4,56,430 रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केले यात सोन्याचे दागिने ,6 मोबाईल, iPad ,मनगटी घड्याळे असा एकूण 4,56,430/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपआयुक्त मनोज पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र रानमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर आणि पोलीस निरीक्षक रोहित सावंत यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. गुन्हे शाखेच्या पोलीस अधिक तपास करत आहे.
रेल्वे प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत आरोपी प्रवाशांच्या वस्तूंवर लक्ष ठेवून चोरी करायचा. तो मुख्यतः रात्रीच्या वेळी गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लक्ष्य करत असे. झोपलेल्या किंवा गाढ निद्रेत असलेल्या प्रवाशांच्या पर्स, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू हुशारीने लंपास करून तो लगेचच रेल्वे स्थानकांवर उतरून गायब होत असे.पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास करत तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फूटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. अखेर कल्याण रेल्वे स्थानकाजवळ त्याला अटक करण्यात यश आले. चौकशीदरम्यान त्याने अनेक गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्याच्यावर यापूर्वीही अनेक चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.