कोल्हापूर: कोल्हापूरातून अनेक अंधश्रद्धेच्या अनेक घटना समोर येत आहे. त्यात विशेष म्हणजे स्मशानभूमीत करणी करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. चिठ्ठी लिहून, गुलाल -कुंकू, लिंबू ठेवण्याचे प्रकार वाढले आहेत. आता कोल्हापूर येथील भुदरगड तालुक्यातील एका गावात ही घटना समोर आली आहे. धक्कदायक म्हणजे एका विवाहित महिलेनं अश्या प्रकारची अघोरी पूजा केली आहे. ही पूजा आपल्या पतीसोबत सोडचिठ्ठी आणि इतर काही व्यक्तींच्या आयुष्याचं वाटोळं व्हावं यासाठी केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Crime News : पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागात घरे फोडून लाखो रुपयांवर मारला डल्ला
ही घटना भुदरगड तालुक्याच्या कुर गावातील स्मशानभूमीत घडली आहे. या गावातील एका मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी गावकरी स्मशानभूमीत जमले आहे. यावेळी गावकऱ्यांमध्ये काही व्यक्तींना कोणतीतरी पूजा केल्याचे दिसून आले आहे. या पुजेमधील साहित्यावरून हा एखादा करणी भानामतीचा प्रकार असल्याचा काहींनी अंदाज बांधला आहे. कुर येथील स्थानिकांनी दिलेल्या माहिती नुसार, गावातील स्मशानभूमीत ग्रामस्थांना आढळून आलेल्या वस्तुमध्ये एक चिठ्ठी फार महत्वाची आहे. या चिठ्ठीत असलेल्या मजकुरातून हा सर्व प्रकार एका विवाहित महिलेने केला असल्याचं अंदाज आहे. सोडचिट्टी मिळावी आणि काही लोकांचं वाईट होउ दे या हेतूने ही पूजा करण्यात आल्याचे समजते. सापडलेल्या सामानात एक बाहुली, नारळ, लिंबू, लोखंडी खिळे, गुलाल आणि लिहिलेला कागद अशा या सगळ्या वस्तू होत्या.
चिठ्ठीत लिहलेल्या मजकूरात एका महिलेचं नाव लिहलेलं होतं. या नावानंतर सोडचिट्टी मिळावी आणि काही लोकांची नावे लिहिलेली. ज्या लोकांची नावे लिहिलेली त्यांची वाट लागू दे असं लिहिलेलं होतं. या चिठ्ठीतील मजकूर वाचल्यानंतर ही अंधश्रद्धा नेमकी कशासाठी असेल याचा अंदाज येतो. या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. तर काहींनी संताप व्यक्त केला आहे.
अल्पवयीन मुलीचा रस्त्यात गाठून विनयभंग
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलीला इस्टाग्रामवर वारंवार मॅसेज करून तसेच तिचा पाठलाग करून तिच्या भावाला मारहाण केली. त्याला हत्याराचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोहेल उमर शेख याच्यासह त्याच्या दोन मित्रांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत मुलीच्या भावाला जेव्हा आरोपी धमकी देत होते, तेव्हा आजुबाजुला जमलेले लोक पाहात असताना लोकांसमोर हवेत हत्यार फिरवुन कोणी आमच्या जवळ आले तर एक एकाला मारून टाकून असे म्हणत दहशत देखील माजवली असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. मागील चार वर्षापासून आरोपी हे पिडीत मुलीला त्रास देत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. भावाला मारहाण तसेच धमकावल्यानंतर पिडीत कुटूंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.