सौजन्य - नवराष्ट्र टीम
अहमदपूर : अहमदपूर शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर येथे केले. अहमदपूर येथे नगरपालिकेच्या वतीने ९९ लक्ष रुपयाच्या नमो उद्यानचा भूमिपूजन समारंभ व शहरातील वाढीव वस्तीसाठी ०२ कोटी ९९ लक्ष रुपयाच्या पाईपलाईनचा भूमिपूजन समारंभ राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते.
यापुढे बोलताना सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील म्हणाले की राज्यात व अहमदपुर शहरात महायुतीचे सरकार असून, शहराच्या मूलभूत सुविधेला प्राधान्य देत शहराचा विकास करण्याला आपण सर्वजण प्राधान्य दिले पाहिजे. माझी जिथे ही मदत लागेल तिथे मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी मदत करण्यास तयार असल्याचे सुद्धा सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील म्हणाले. अहमदपूर शहरासाठी नगरपालिकेने सौर ऊर्जेच्या प्रकल्पासाठी पुढाकार घ्यावा. पाण्याची योग्य नियोजन केले पाहिजे त्याचबरोबर शहरात नाट्य उभाराणीसाठी आपण जागा बघा मी नाट्यगृहासाठी निधी उपलब्ध करून देतो. अहमदपुर शहरासाठी रिंग रोडचा प्रस्ताव प्रस्तावित असून तो लवकरच मार्गी लागेल तो मार्गी लागल्यानंतर अहमदपूर शहरात येणाऱ्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात आळा बसणार असल्याचे सुद्धा सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील म्हणाले.
यावेळी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, रिपाईचे जिल्हाध्यक्ष रिपाईचे बाबासाहेब कांबळे, उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, नगराध्यक्ष स्वप्नील व्हते, उपनगराध्यक्ष अय्याज शेख, निखिल कासनाळे, राहुल शिवपुजे आदींनी मनोगत व्यक्त केली.
नमो उद्यान, वाढीव वस्ती पाणीपुरवठा योजना
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी प्रतिक लंबे यांनी केले यामध्ये त्यांनी नमो उद्यान व वाढीव वस्तीतील पाईपलाईनच्या योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम तत्तापुरे व दयानंद चोपणे यांनी केले तर आभार विकास सोमवंशी यांनी मानले. कार्यक्रमास अहमदपूर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहमदपूर नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.
हे सुद्धा वाचा : पत्नी हरवल्याची तक्रार करणारा पतीच निघाला मारेकरी! मृतदेह नदीत फेकला आणि…






