Crime News Live Updates
बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका पोलीस कर्मचाऱ्यानेच १० लाख रुपयांसाठी पत्नीचा छळ केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांसह चार जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
21 Jun 2025 02:00 PM (IST)
सोलापूरमध्ये एकाच स्कार्फचा वापर करून तरुण-तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापुरातील कर्णिक नगर परिसरातून ही धक्कादायक घटना उघडकीस आली. यामध्ये आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्येही त्यांनी आम्ही भाऊ-बहीण आहोत, आमच्या नात्यावर संशय घेऊ नका, असा उल्लेख केला आहे. मृत युवकाचे नाव रोहित ठणकेदार असून, तो चालक म्हणून काम करत होता. युवतीचे नाव अश्विनी केशापुरे असून, तिने बी. फार्मसीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. सविस्तर बातमी
21 Jun 2025 01:50 PM (IST)
नांदेड जिल्ह्यातून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. ग्रामस्थांनी एका २४ वर्षीय युवकाला चोर समजून बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला. नेटग्रीड प्रणालीमुळे त्याची ओळख पटवण्यात आली. पुढे या प्रकरणाच्या तपासाला गती आली. आणि यांनतर तो चोर नसल्याच समजले. पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे. सविस्तर बातमी
21 Jun 2025 01:40 PM (IST)
बीडच्या एका विवाहितेने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. तिने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव प्रियांका खाकाळ आहे. सविस्तर बातमी
21 Jun 2025 01:28 PM (IST)
अकोल्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रणेच मित्राची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मृतकाचे नाव प्रकाश पंचू जोसेफ (वय अंदाजे 35) असे आहे. तर पवन विलास मोरे उर्फ ‘टकल्या’ असे आरोपीचे नाव आहे. आरोपी सध्या फरार आहे. ही घटना अकोला शहरातील रमाबाई नगर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
21 Jun 2025 12:37 PM (IST)
हेळगाव (ता. कराड) येथील रस्त्यालगत असणाऱ्या घरात अज्ञात चोरट्यांनी महिलेला व कुटुंबातील लोकांना कोयत्याच्या धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच दोन महिलांच्या गळ्यातील मिनी गंठण व कपाटातील सुमारे अडीच तोळे सोन्याचे दागिने असा एकूण अडीच लाखांवर डल्ला मारला. जबरी चोरीचा हा प्रकार शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडला. चोरट्यांचा शेजारील बंद घरे फोडण्याचा प्रयत्न असफल ठरला. चोरीच्या प्रकारामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
21 Jun 2025 12:18 PM (IST)
भंडाराच्या बायपास महामार्गावरील उड्डाण पुलावरुन मोठ्या अपघाताची घटना घडली आहे. होंडा सिटी कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील पती- पत्नीसह त्यांचे दोन चिमुकले गंभीर जखमी झाले आहेत. उड्डाणपुलावरून जाणाऱ्या दुचाकीला होंडा सिटीने मागेहुन जोरदार दिली. ही घटना आज (२१ जून) पहाटेच्या सुमारास घडली.
21 Jun 2025 11:54 AM (IST)
नवी मुंबईच्या न्यू पनवेलमध्ये असाच एक प्रकार समोर येत आहे. एका धनिकपुत्रीने मर्सिडीज कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या दोघांना उडवले आहे. कार चालक १९ वर्षीय मुलगी असून तीच नाव तिथी सिंग असे आहे. ती इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात नवीन पनवेल येथील हिरानंदानी पुलावर बुधवारी रात्री 8.45 वाजता हा अपघात घडला. खारघर पोलिसांनी याप्रकरणी भरधाव वेगात मर्सिडीज बेंझ कार चालवणाऱ्या मुलीला अटक केली आहे.
21 Jun 2025 11:54 AM (IST)
बाणेर भागात एका भरधाव डंपरच्या पाठिमागील चाकाखाली सापडून एका आयटी अभियंत्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर, तिची सहप्रवासी मैत्रिण गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर डंपरचालकाने पळ काढला. पोलिसांनी त्याला रात्री उशिरा अटक केली आहे. तेजल प्रकाश तायडे (२७, रा. तलासरी, ठाणे) असे मृत तरुणीचे नाव आहे. हा अपघात गुरुवारी (१९ जून) मध्यरात्री घडला आहे. याच दिवशी तेजलचा वाढदिवस होता. तर, प्राची जगन्नाथ पाचंगे (२८, रा. डांगे चौक, थेरगाव) हिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बाणेरमधील ज्युपिटर हॉस्पिटल परिसरात घडली आहे.
21 Jun 2025 11:38 AM (IST)
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतांना आणखी एक बीडमध्ये एक अशीच घटना घडली आहे. बीडच्या एका विवाहितेने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. तिने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव प्रियांका खाकाळ आहे. तिने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विषारी औषधाचा सेवन करून आत्महत्या केली.