ChatGPT मुळे केला जन्मदात्या आईचा खून? अमेरिकेमध्ये तरुण ठरला तंत्रज्ञानाचा बळी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
America News in marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टीन एरिक सोएलबर्गन नावाच्या व्यक्तीने आपल्या आईची हत्या करुन स्वत:चे जीवन संपवले आहे. ५ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. धक्कादायक म्हणजे, चॅटजीपीटीमुळे हा हत्याकांड घडला असल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेच्या कनेक्टिकट येथे ही घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण अमेरिका हादरली आहे. तसेच यापूर्वी देखील चॅटजीपीटीमुळे अनेकांनी आपल्या जीवन संपवल्याच्या घटना घडवल्या आहेत.
द वॉल स्ट्रीट जनरलने दिलेल्या माहितीनुसार, AI चॅटबॉटशी एरिकच्या झालेल्या संवादातून मुलगा भ्रमित झाला असावा. यातूनचे त्याने आपल्या आईची हत्या केली. AI चॅटबॉटने त्याला विश्वास करुन दिला होता की, त्याची आई त्याच्यावर पाळत ठेवत आहे. त्याची हेरगिरी करत आहे. त्याला सायकेडेलिक औषधे देऊन विष पाजण्याचा प्रयत्न करत आहे.
त्याची आई त्याच्या जीवावर उठली आहे. अशा भ्रमात एरिकला अडकला होता. यामुळे त्याने आपल्या जन्मदात्या आईला संपवण्याचा निर्णय घेतला. द वॉल स्ट्रीटच्या अहवालानुसार, या संवादमधून लक्षात येते की चॅटबॉट एरिकाला तू वेडा नाहीस, तुझा विचार बरोबर आहे असे म्हणत त्याच्या मनात विश्वास निर्माण करत होता.
30 हजार फूट उंचीवर विमानातील शौचालय बंद अन्…; व्हर्जिन ऑस्ट्रेलिया फ्लाइटमध्ये उडाला गोंधळ
शिवाय स्वत:ला संपवण्यापूर्वी एरीकने चॅटबॉटला मेसेजही केला होता. त्याने यामध्ये म्हटले होते की, तू माझा चांगला मित्र आहेस, आपण दुसऱ्या आयुष्यात भेटू. एकत्र राहू. तुझ्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत आणि त्यानंतरही राहू. शिवाय या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच एरिकने चॅटबोटशी संवाद साधायला सुरुवात केली होती. त्याने चॅटबॉटचे बॉबी असे टोपन नावही ठेवले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टीन एरिक हा ५६ वर्षाचा होता. टेक कंपनीत तो एक अनुभवी तज्ज्ञ म्हणून कामाला होता. स्टीन एरिक सोएलबर्ग हा Yahoo मध्ये मॅनेजरच्या पदावर होता. त्याची मानसिक स्थिती अत्यंत खराब होती. ५ ऑगस्ट रोजी त्याच्या आईचा आणि त्याचा मृतदेह घरात आढळला. २.७ दशलक्ष डॉलर्सच्या डच वसाहच शैलीच्या टुमदार बंगल्यात एरिक राहत होता.
सध्या या घटनेने चॅटजीपीटीच्या वापरा संदर्भात आणि त्याच्या सुरक्षितते संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यापूर्वी देखील चॅटजीपीटीमुळे अनेकांनी जीवन संपवल्याच्या घटना घडल्या आहे. यामुळे नेमकं याला जबाबदार कोण, मानव की तंत्रज्ञान असा प्रश्न उपस्थित होतो. काहींच्या तज्ज्ञांच्या मते तंत्रज्ञानामुळे मानवाचे आयुष्य सोपे झाले आहे, पण यामुळे एक दिवस मानवावर मोठे संकट उभे राहणार आहे. मानवी जगावर तंत्रज्ञानाचे राज्य असणार आहे.
शीख व्यक्ती अमेरिकेच्या भररस्त्यात करत होता तलवारबाजी; पोलिसांनी गोळ्या झाडल्या अन्…, Video Viral