Crime News Live Updates
नागपूर शहर अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी कंबर कसली आहे. जवळपास दररोजच अमली पदार्थांची तस्करी, विक्री करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. त्यातच गणेशपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावर रविवारी रात्री बस स्थानक परिसरातून एका एमडी विक्रेत्याला अटक केली. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीची झडती घेतली असता त्याच्याजवळ 1.68 लाख रुपये किंमतीची 16.07 ग्रॅम एमडी मिळाली. चौकशीत तो दक्षिण नागपूरचा माजी नगरसेवक अजय बुग्गेवार यांचा मुलगा संकेत बुग्गेवार (वय 29, रा. आशिर्वादनगर) असून बॉडी बिल्डिंगसाठी प्रोटीन पावडरसोबत ड्रग्ज घेत होता आणि त्याची विक्रीही करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.
15 Jul 2025 05:41 PM (IST)
सोलापूरहून तडवळच्या दिशेने जाताना हत्तूर शिवारातील नाईकवाडी यांच्या शेताजवळ कार उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारखाली सापडून डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी मध्यरात्री झाला आहे. आशिष इरण्णा पनशेट्टी (वय ४०, रा. तडवळ, ता. अक्कलकोट) असे अपघातात मरण पावलेल्या डॉक्टरचे नाव आहे.
15 Jul 2025 04:17 PM (IST)
सासवड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने शासकीय कामकाजाच्या वेळीच मद्यधुंद अवस्थेत असताना चारचाकी गाडी बेदरकारपणे चालवून एका दुचाकीस जोरदार धडक दिली. तसेच धडक दिल्यानंतर काही अंतर फरफटत नेहून तिथेच जखमी व्यक्तीला सोडून पळ काढला होता. यातील जखमी व्यक्तीचे निधन झाल्यानंतर चालक पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. वास्तविक पाहता या संपूर्ण प्रक्रियेत खूप वेळ गेल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे अखेर निलंबन झाले आहे. योगेश गरुड असे निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
15 Jul 2025 03:01 PM (IST)
पुण्यातील महंम्मदवाडी परिसरातील बंद वॉईन शॉपी फोडून चोरट्यांनी रोकडसह विदेशी दारूंच्या बाटल्यांची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. तत्पुर्वी गेल्या काही दिवसांपासून दारूच्या दुकानांमधील चोऱ्या वाढल्या असून, चोरटे रोकड आणि दारूच्या बाटल्यांची चोरी करत आहेत. एकीकडे मद्याच्या दरात प्रचंड वाढ झालेली असताना आता मालकांना या चोरट्यांकडून देखील झळ बसू लागली आहे. तर भाव वाढीमुळे तर मद्यांची चोरी हात नाही ना, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात हरप्रितसिंग होरा (वय ४०, रा. कोंढवा खुर्द) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
15 Jul 2025 02:41 PM (IST)
पालघर : पालघरच्या नानिवली गावात चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न करतांना सात आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळण्यात यश आले आहे. घरमालकाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न फसला आहे. याप्रकरणी सातही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मध्यरात्री झालेला हा दरोड्याचा प्रयत्न आणि घटनास्थळावरून पळ काढतानाचा घटनाक्रम CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
15 Jul 2025 02:10 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला चटके दिले, तिला उपाशी ठेवलं. याच कारण केवळ एवढच की त्या अल्पवयीन मुलीला चपाती नीट बनवता येत नव्हती. ही घटना छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागात समोर आली आहे. या प्रकरणी मुलीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तिच्या आई वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
15 Jul 2025 01:55 PM (IST)
लुटमारीच्या घटनांत वाढ झालेली असतानाच एका दिल्ली रहिवासी ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने पुण्याच्या रेल्वे स्थानकापासून भिमाशंकरच्या घनदाट जंगलात नेहून रिक्षा चालकाने चाकूच्या धाकाने लुटल्याचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या तपासातून ही बाब स्पष्ट झाली असून, रिक्षा चालक निघून आल्याने ज्येष्ठाने हा बनाव रचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु, या बनावामुळे पोलिसांची यामुळे तारांबळ उडाली.
15 Jul 2025 01:36 PM (IST)
पुणे जिल्ह्यातील मुळशीचे राजेंद्र हगवणे यांच्या सूनेने टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन राजकीय वर्तुळातही चर्चा सुरु आहे. वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. राज्यभरात गाजलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात न्यायालयात १६७० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. वैष्णवीचा पती, सासरा, सासू, दीर, नणंदेसह एकूण ११ आरोपींविरोधात पुणे न्यायालयात हे आरोपपत्र सोमवारी दाखल करण्यात आले. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर ५८ दिवसांनंतर ठोस पुरावे संकलित करून आरोपपत्र दाखल केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
15 Jul 2025 01:24 PM (IST)
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस दलात भरती होण्यासाठी तळजाई टेकडीवर नियमित सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही गावगुंडांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आलं आहे. या विद्यार्थ्यांना अपमानास्पद शब्दांत हिणवण्यात देखील आलं आहे. या विद्यार्थ्यांमध्ये मुली देखील होत्या. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
15 Jul 2025 12:27 PM (IST)
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काहीही काम धंदा न करता सातत्याने दारू पिऊन त्रास देत असल्यामुळे लहान भावाचा मोठ्या भावाने चाकूने सपासप वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार बिबवेवाडी परिसरात घडला आहे. मोठ्या भावानेच लहान भावाचा खून केल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रवीण उर्फ ऋतिक दत्तात्रय नवले (वय २३, रा. अप्पर इंदिरानगर, गणेशनगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ अनिकेत (वय २६) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
15 Jul 2025 12:20 PM (IST)
पुण्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पुण्यात एका मार्गावर ते ही एकाच ठिकाणी गेल्या तीन तासात तब्बल दहा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. पण या अपघाताला जबाबदार कोण असा संतप्त सवाल नारिकांनी विचारला आहे.
15 Jul 2025 12:11 PM (IST)
पुण्यातील बिबवेवाडी परिसरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सख्ख्या मोठ्या भावाने आपल्याच लहान भावाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव प्रवीण उर्फ ऋतिक दत्तात्रय नवले (24) असे नाव आहे. तर हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव अनिकेत दत्तात्रय नवले (26 ) असे आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
15 Jul 2025 12:10 PM (IST)
परभणी: परभणी मधून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. टीसी काढण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थाचालकांकडून बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. मृतकाचे नाव जगन्नाथ हेंडगे आहे. ही घटना परभणीच्या पूर्णा तालुक्यातील हट्टा परिसरात असणाऱ्या हायटेक निवासी शाळेमध्ये घडली आहे. या घटनेला चार दिवस उलटले असून अद्याप आरोपी फरार आहे. आरोपीचे नाव संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि पत्नी रत्नमाला चव्हाण असे आहे.
15 Jul 2025 12:09 PM (IST)
वसई: मित्रांच्या ग्रुपला धबधब्यावर पिकनिकला जाणं जीवावर बेतलं आहे. डोहात दोन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. काल सोमवारी वसईच्या चिंचोटी धबधब्यावर पिकनिकसाठी गेले होते. त्यावेळी पोहत असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही मुलं डोहात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी धबधब्यापर्यंत दोन तासाची पायपीट करत जाऊन, एकाला पाण्यामध्ये बुडून तर दुसऱ्याला गाळाच्या साहाय्याने बाहेर काढण्यात यश आले आहे. मृतकाचे नाव प्रेम प्रल्हाद शहजराव (वय 22) रा. अशोक नगर काम इस्टेट रॉड गोरेगाव पूर्व, सुशील भारत ढबाले ( वय 24) रा. अशोक नगर काम इस्टेट वालभात रोड गोरेगाव पूर्व असे नाव आहे.
15 Jul 2025 12:09 PM (IST)
मुंबई येथून एक धक्कादायक आणि अमानवी घटना समोर आली आहे. कर्ज न फेडल्याने दोन तरुणांसोबत चार जणांनी अमानवी कृत्य केलं आहे. केवळ पैसे वेळेवर न दिल्याने या दोघांना मुखमैथुन करायला लावले असल्याचा संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. एवढंच नाही तर त्यांनी पीडित तरुणांना निर्वस्त्र केले आणि त्यांचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे.
15 Jul 2025 12:08 PM (IST)
खेड तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. खेड तालुक्यातील खालूंब्रे परिसरात सोमवारी (दि. १४) सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू झाला असून, दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. कामावर जाण्यासाठी लिफ्ट घेतलेल्या तरुणाचा हा प्रवास दुर्दैवाने अखेरचा ठरला आहे. गजानन बाबुराव बोलकेकर (वय २६, रा. नांदेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आदित्य गजाननराव गायकवाड (वय २३, रा. येलवाडी, ता. खेड) हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची नोंद महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, विजय शंकरराव तंतरपाले (वय २४, रा. चाकण) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मोहम्मद अरमान कमरुद्दीन खान (वय ३०, रा. धारावी, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.