प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रींच्या मुलाने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही अभिनेत्री कांदिवली परिसरातील सी ब्रुक वास्तव्याला होती. ती टेलिव्हिजनवरील गुजराती मालिकांमध्ये काम करत होती. बुधवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
धक्कादायक! जबरदस्तीने मित्राला लिंगबदल करण्यास भाग पाडून बलात्कार, १० लाख दिले नाही तर आयुष्य…..
प्राथमिक माहितीनुसार, अभिनेत्रीने आपल्या मुलाला ट्युशनला जाण्यास सांगितले. मात्र त्याला जायचे नव्हते. यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे मुलगा संतापला होता. याच संतापाच्या भरात मुलाने इमारतीच्या 57 व्या मजल्यावर जाऊन खाली उडी टाकली. उडी टाकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहितीमिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परंतु या मुलाने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली. याचा तपास पोलीस करत आहे. आत्महत्या करणारा मुलगा या दाम्पत्याचा एकुलता एका मुलगा होता. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
धक्कादायक ! डॉक्टरने तरुणीला चेकअपच्या नावाखाली बेडवर झोपवलं अन् नंतर…
गडचिरोली : रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना देव समजले जाते. मात्र, गेल्या काही वर्षात याच डॉक्टरी पेशाला काळीमा फासणाऱ्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना कोरची तालुक्यात उघडकीस आली आहे. उपचाराच्या नावाखाली खासगी डॉक्टरने एका तरुणीशी गैरवर्तन केले. ही घटना बुधवारी (दि.2) सकाळी 9 वाजताच्या सुमारास तालुक्यातील बोरी येथे घडली.
डॉक्टर असलेल्या सुभाष हरप्रसाद बिश्वास (वय 48, रा. बोरी, ता. कोरची) याच्या विरोधात बेडगाव पोलिसांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी सुभाष यास अटक केली. बेडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड राज्यातील 26 वर्षीय पीडित तरुणीला जुलाबाचा त्रास होत असल्याने ती आपल्या भावासोबत तालुक्यातील बोरी येथील आरोपी खासगी डॉ. सुभाष बिश्वास यांच्या रुग्णालयात उपचारासाठी आली होती. उपचाराच्या बहाण्याने आरोपी डॉक्टरने तिला केबिनमधील चेकअप बेडवर झोपवून तिच्याशी गैरवर्तणूक केले.
दरम्यान, पीडित तरुणीने आरडाओरड करताच तरुणीचा भाऊ केबिनमध्ये धावून आला. यावेळी डॉक्टरने तिच्या भावासोबतही बाचाबाची केली. तत्काळ पीडित तरुणीने बेडगाव पोलिस मदत केंद्र गाठून डॉक्टराविरोधात तक्रार दाखल केली.
स्वच्छतागृहात गेलेल्या महिलेचा व्हिडीओ चित्रित करणाऱ्या इंजिनिअरला अटक; मोबाइल ताब्यात