काय नेमकं प्रकरण?
पीडित महिलांनी पोलिसांना सांगितले की, अज्ञात आरोपीने स्वतःची प्रसिद्ध निर्माता विकास बहल अशी ओळख सांगितली होती आणि या नावाने नावाने त्याचं इंस्टाग्राम अकाउंट देखील होतं. ऑडिशनच्या बहाण्याने बऱ्याच मुलींशी संपर्क साधल्यानंतर, आरोपीने कथित निवड प्रक्रियेचा भाग म्हणून पीडित तरुणींकडून बिकिनीवरील तसेच त्यांचे अर्धनग्न फोटो मागितले. त्यामुळे पीडित तरुणींनी आरोपीला निर्माता समजून त्याला पैसे दिली आणि काही खाजगी फोटो सुद्धा पाठवले आणि त्यांनतर आपला फोन आरोपी हा बंद करायचा. यातील कित्येक तरुणींना तर आरोपीने भेटण्यासाठी बोलवलं होतं. जेव्हा खरा निर्माता-दिग्दर्शक विकास बहल यांना त्यांच्या नावाने फसवणूक सुरू असल्याचे कळलं तेव्हा त्यांनी खार पोलिस ठाण्यात जाऊन एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली.
पोलिसांचं आवाहन
पीडित तरुणीने याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी बनावट निर्मात्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून याचा तपास सुरु केला आहे. फसवणूक, आयटी कायदा आणि महिलांचा छळ या कलमांखाली आरोपी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोपीचे पीडित तरुणींसोबत झालेल्या चॅट्स, त्याचे सोशल मीडिया अकाउंट, कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेज याचा तपास पोलीस करत आहेत. खार पोलिसांनी महिला आणि तरुणीना आवाहन केलं आहे की त्यांनी अधिकृत पुष्टीशिवाय कोणत्याही ऑडिशन किंवा कास्टिंग कॉलवर विश्वास ठेवू नये.
‘तू जर व्यवस्थित राहिली नाहीस तर हातपाय तोडून टाकीन…’; पैशांसाठी विवाहितेचा छळ
Ans: ऑडिशन व काम देण्याचं आमिष दाखवून पैसे व फोटो मागवले, नंतर नंबर बंद केला.
Ans: प्रसिद्ध निर्माता विकास बहल असल्याचे भासवत होता.
Ans: खार पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोशल मीडिया, चॅट्स, CCTV तपासत तपास सुरू केला.






