काय नेमकं प्रकरण?
काही दिवसांपूर्वी अंधेरी पूर्व येथील एका नाल्यात साफसफाईचे काम सुरु असताना कामगारांना कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला होता. मृतदेह इतका कुजला होता की त्याची ओळख पटवणे देखील कठीण झाले होते. पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. तर दुसरीकडे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
कशी पटली ओळख ?
पोलिसांनी महिलेची ओळख पटवण्याची गेल्या काही महिन्यांतील ‘बेपत्ता’ तक्रारी तपासल्या. मृतदेहाच्या अंगावरील कपड्यांच्या वर्णनावरून पोलिसांना जानेवारी महिन्यात सहार पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एका तक्रारीचा सुगावा लागला. महिलेचे नाव जेमे सिक्यूअरा असल्याचे निष्पन्न झाले. तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार तिचा भाऊ जोसेफ थॉमस कोल्हीयो (६३) याने तक्रार दिली होती.
कशी केली हत्या?
जोसेफ कोहेलो (६३) हा आपल्या वृद्ध बहिणीसोबत अंधेरी मरोळ येथील ओमनगर परिसरात राहत होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात जोसेफने बहिणीला जोरात धक्का दिला, ज्यामुळे त्या दरवाज्यातून खाली पडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. बहिणीचा मृत्यू झाल्याचे समजताच जोसेफ घाबरला आणि त्याने पत्नी मरिया कोहेला हिच्या मदतीने मृतदेह लपवण्याचा कट रचला. तपासादरम्यान पोलीस जेव्हा जेमेच्या घरी चौकशीसाठी गेले तेव्हा जोसेफ आणि मारिया यांच्या संशयास्पद हालचालींनी पोलिसांचे लक्ष वेधले.
आरोपींना अटक
पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले, त्यांची कठोर चाकाशी केली असता त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास करत आहे.
सावकारी पद्धतीने 44 लाखांची फसवणूक, दोघांंवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
Ans: जेमे सिक्यूअरा (वय 80) असे तिचे नाव होते.
Ans: तिच्या भावाने, जोसेफ कोहेलोने पत्नीच्या मदतीने हत्या केली.
Ans: अंधेरी पूर्व येथील नाल्यात साफसफाईदरम्यान मृतदेह सापडला.






