मुंबई उपनगरातील घाटकोपर परिसरात असणाऱ्या आर सिटी मॉलमध्ये सोमवारी सकाळी एका व्यक्तीने आत्महत्या केली. तो मॉल फिरायला गेला आणि अचानक तिसऱ्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली. मृत व्यक्तीचे नाव दीपक जोशी (वय ३८) असे होते. या घटनेननंतर पार्कसाईट पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून दिपकचा मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. या घटनेनंतर एकाच खळबळ उडाली आहे.
ACB summons to Anjali Damania: राजकारण तापणार! अंजली दमानियांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं समन्स
दीपक जोशी ने आर सिटी मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यानंतर त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हे दृश्य पाहून दुकानदार आणि ग्राहकांना धक्काच बसला आहे. या घटनेवेळी आर सिटी मॉलमध्ये उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शींने सांगितले की, सकाळी ११:३०च्या सुमारास आर सीटी मॉलच्या मुख्य लॉबीमध्ये अचानक स्फोट झाल्यासारखा आवाज आला. त्यामुळे लोक प्रचंड घाबरले. मात्र, थोड्यावेळात सगळा प्रकार लक्षात आला. आम्हाला लॉबीत एक तरुण जमिनीवर पडलेला दिसला. त्या तरुणाचं डोकं फुटलं होत आणि त्यामधून रक्तस्त्राव सुरु होता. त्यानंतर पोलिसांनी येऊन ताब्यात घेतला. अशी माहिती या प्रत्यक्षदर्शी तरुणाने दिली.
दीपक एकुलता एक मुलगा
दीपक जोशी याचे कुटुंब घाटकोपरच्या कामा लेनमधील बारोटवाडी येथे वास्तव्याला आहे. दीपकच्या घरी त्याचे आई-वडील आणि पत्नीसह राहत होता. दीपकचा मुलगा कच्छमध्ये त्याच्या मामाच्या घरी राहतो आणि तिथे शिकतो. दीपक हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील लहानसहान कामं करायचे. तर त्याची आई लोकांच्या घरी स्वयंपाक करायची. दीपक जोशी याची बायको कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावण्यासाठी बायको लहान मुलांना सांभाळण्याचे काम करत होती.
यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न
दीपकने यापूर्वी दोन ते तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अशी माहिती देखील समोर आली आहे. दीपक लहानपणापासूनच मानसिकदृष्ट्या कमकुवत होता. तो शक्य त्या मार्गाने पैसे कमविण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याचा प्रयत्न फसायचा. दहा वर्षांपूर्वी बनावट नोटा छापल्याप्रकरणी दिपकलाही पोलिसांनी अटक केली होती. याशिवाय कर्ज घोटाळा आणि अनेक आर्थिक घोटाळ्यामध्ये त्याचा सहभाग होता असे बारोटवाडीतील रहिवाशांनी सांगितले. दिपकला झटपट आणि खूप पैसे कमवायचा होता. यापूर्वीही त्याने वाशी पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र मच्छिमारांनी त्याला वाचवले होते.
25 लाख पॅकज असून काढायची अश्लील व्हिडीओ, IIT पदवीधर तरुणीचा धक्कादायक कांड समोर