CRIME(फोटो सौजन्य - PINTEREST)
नागपूरमध्ये एका पाठोपाठ एक हत्येचं सत्र सुरूच आहे. नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रांमध्ये सुरु असलेली मास्कसरी एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. मित्रांसमोर थापड मारली याचा राग सहन न झाल्याने मित्राने मित्राचीच लाडकी दांडक्याने मारहाण करत जीव घेतला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून ही घटना नागपूरच्या हिवरी नगर परिसरात घडली आहे.
Buldhana Accident : बुलढाण्यात भीषण अपघात, ट्रक आणि बसच्या धडकेत 4 जणांचा मृत्यू; २० जण जखमी
४० वर्षीय जितेंद्र उर्फ जितू राजू जयदेव हे आपल्या जुन्या मित्रांना भेटायला आले होते. सहज एकमेकांची खोड काढत असतांना त्यांचा मित्र आरोपी इतवारीदास शिवदास माणिकपूर याच्यासोबत मोबाईल घेण्यावरून वाद झाला होता. या वादावरून आरोपी इतवारीदासने आपल्याच मित्राची लाकडी दांडक्याने जितूवर वार करत हत्या केली.
नेमकं काय घडलं?
जितूला आरोपीने म्हंटले की “तू माझा मोबाईल लपवला असून आताच्या आता माझा लपवलेला मोबाईल देऊन टाक.” यावर जितू याने म्हंटले कि “माझ्याकडे मोबाईल नाही”, यावरऔन त्यांच्यात वाद झाला. इतवारीदास समजून घेत नाही, असा विश्वास झाल्याने जितू याने रागात आरोपीला कानाखाली मारली. नेमका याचाच राग आल्याने त्याने “थांब, तुला पाहुन घेतो” असे म्हंटले. आणि निघून गेला.
जितू हा तिथे पानटपरीजवळ फुटपाथवर बसलेला असताना आरोपीने लाकडी दांड्याने जितूच्या डोक्यावर, पाठीमागे मारहाण केली आणि तिथून पळून गेला. या मारहाणीत जितू गंभीर जखमी झाला. पारडी पोलिसांनी मिळालेल्या माहिती नुसार त्वरित दाखल घेत जखमी जितूला जवळी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी पारडी पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपी इतवारीदास शिवदास माणिकपूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
नागपूर हदारल! 19 वर्षीय मित्रानेच आपल्या चांगल्या मित्राची केली हत्या
नागपूरमध्ये एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. मित्रानेच मित्राची हत्या केल्याचं समोर आलं आहे. त्या दोन्ही मित्रांमध्ये कोणतेच भांडण नव्हते कोणतेच वाद नव्हते , इतर कोणते कारणही नव्हते फक्त मित्र श्रीमंती दाखवत होता, म्हणून त्याचा हेवा वाटत होता. याकारणामुळे १९ वर्षीय मित्राने अल्पवयीन मित्राची कोल्ड्रिंकमध्ये विष देऊन हत्या केली. हा प्रकार नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत घडला आहे. मृतकाचे नाव वेदांत खंडाडे असून आरोपीचे नाव मिथिलेश चकोले असे आहे.
नागपूर हदारल! 19 वर्षीय मित्रानेच आपल्या चांगल्या मित्राची केली हत्या; तो श्रीमंती दाखवयाचा….