१०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर…
या प्रकरणातील ४५ वर्षीय महिलेचे नाव बच्चीबाई हाडोंगे असे आहे. या महिलेने आणि तिच्या पतीने १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मुलीला दत्तक दिल्याचे उघडकीस आले आहे. अंगणवाडी सेविकांनी दत्तक पत्राच्या आधारे जन्म दाखला बनविल्याचा सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप आहे. या सर्व प्रकरणाची आता चौकशी होणार आहे. महिला बालविकास विभागाच्या चौकशी समितीत काय समोर येते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
लेकाने केली बापाची निर्घृण हत्या, झोपेत असताना डंबेल्स घातले डोक्यात; कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा
नेमकं काय प्रकरण?
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील टाके देवगाव या आदिवासी बहुल पाड्यात वावी हर्ष येथे राहणारी बच्चीबाई हाडोंगे (४५ वर्ष) असे नाव आहे. तब्बल १४ मुले झालीत. यापैकी सहा पेक्षा जास्त मुली आणि मुले पैश्यांसाठी विकल्याचा संशय स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. १० ऑक्टोबर २०२५ रोजी या महिलेला एका मुलगा झाला. या बाळाचे वजन कमी असल्याने आरोग्य विभागाच्या आशा कर्मचाऱ्यांमार्फत त्याची घरपोच आरोग्य तपासणी सुरु होती. मात्र, महिलेने बाळ विकल्याचे माहिती आशा कर्मचाऱ्यांना दिली.
याआधीही अशा प्रकारच्या दोन ते तीन घटना घडल्यामुळे आशा सेविकांचा संशय वाढला आणि त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रकरणाची माहिती दिली. डॉक्टरांकडून ही माहिती मिळताच घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली. घडलेल्या घटनेमुळे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनाही माहिती मिळाली.
महिलेची हालाकीची परिस्थिती होती. तिला तिच्या बाळाचे संगोपन करणे शक्य नव्हते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार,आरोग्य विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे जन्मदात्या आईनेच नवजात बाळ विकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
७५ वर्षीय नराधमाने चिमुरडीवर केले सहा महिने अत्याचार; चिमुकलीला पैसे आणि चॉकलेटचे आमिष दाखवत…
नाशिक जिल्ह्यातून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका ७५ वर्षीय नराधमाने चिमुरडीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. पीडित चिमुरडी केवळ ९ वर्षाची आहे. ही घटना नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे घडला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात लाट पसरली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील डोंगराळे येथील ३ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेने राज्यात संतापाची लाट उसळली होती. आता पुन्हा नाशिक जिल्ह्यात ९ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आले आहे.
तरुणीने तरुणाला भेटायला बोलावले, दोघे कात्रज घाटाकडे निघाले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Ans: आशा सेविकांना नवजात बाळाच्या आरोग्य तपासणीदरम्यान बाळ दिल्याची माहिती मिळाली. याआधीही 2-3 मुलं गायब असल्याची माहिती मिळाल्याने संशय वाढला.
Ans: 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दत्तक पत्र तयार केल्याचे उघड झाले असून त्यावरून जन्म दाखला जारी केल्याचा आरोप आहे.
Ans: महिला-बालविकास विभागाने चौकशी समिती नेमली आहे. आशा सेविका, आरोग्य विभाग व स्थानिकांच्या माहितीच्या आधारे प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.






